आशिया चषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर गुणतालिकेत ग्रुप ब मध्ये अफगाणिस्तान ४ गुण आणि +२.४६७ नेट रनरेटसह ते पहिल्या क्रमांवर पोहोचला आहे. तसेच सुपर -४ मध्ये प्रवेश करणारा अफगाणिस्तान हा पहिला संघ ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – त्याने बांगलादेशच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं अन् रचला ‘हा’ अनोखा विक्रम; अफगाणीस्तानच्या गोलंदाजाने केली कमाल

गुणतालिका अफगाणिस्तान अव्वल

ग्रुप ब मध्ये अफगाणिस्ताने आपले दोन्ही सामने जिंकले असून ४ गुण आणि +२.४६७ नेट रनरेटसह ते पहिल्या क्रमांवर आहे. तर बांगलादेश आणि श्रीलंका शून्य गुणांसह अनुक्रमे -०.७३१ आणि -५.१७६ नेट रनरेटसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकवर आहे.

तर ग्रुप ए मध्ये भारत एक सामना जिंकत २ गुण आणि +०.१७५ नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर हॉंगकॉंग आणि पाकिस्तान शून्य गुणांसह अनुक्रमे ०.००० आणि -०.१७५ नेट रनरेटसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकवर आहे. हॉंगकॉंग पहिला सामना आज (३१ ऑगस्ट ) भारताबरोबर आहे.

अफगाणिस्तानचा बांगलादेशवर विजय

बांगलादेशने नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय सुरुवातीला काहीसा चांगला ठरला नाही. अफगाणिस्तानच्या नजीब उर रहमान याने बांगलादेशच्या पहिल्या फळीतील तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. फलंदाज मोहम्मद नईम (६), अनामुल हक (५) स्वस्तात बाद झाले. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या शकीब अल हसनने ११ धावा केल्या.

दरम्यान, बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १२८ धावांचे लक्ष्य गाठताना अफगाणिस्तानचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. हजरतुल्ला झाझाई (२३, पायचित), रहमानउल्ला गुरबाज (११, यष्टिचित) हे दोन्ही सलामीवीर खास कामगिरी करू शकले नाहीत. त्यानंतर इब्राहीम झदरान-नजीबुल्ला झदरान या जोडीने संघाला विजयापर्यंत नेलं. दोघांनीही मोठे फटके मारत बांगलादेशच्या हातातून विजय खेचून आणला. नाबाद खेळी करत इब्राहीम, नजीबुल्ला यांनी अनुक्रमे ४२ आणि ४३ धावा केल्या. ज्यामुळे अफगाणिस्तानला विजयाची गोडी चाखता आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan first team to reach at super 4 after win over bangladesh know time table spb