South Africa vs Afghanistan 3rd ODI Highlights: अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामनाही एकतर्फी झाला. अफगाणिस्तानने पहिले दोन सामने एकतर्फी जिंकले होते, तर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अप्रतिम कामगिरी करत अफगाणिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला १६९ धावांत ऑलआउट केले आणि ३३ षटकांत १७० धावा करून सामना जिंकला. पण या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा खेळाडू रहमत शाह इतक्या विचित्र पद्धतीने रनआऊट झाला की सर्वच आश्चर्यचकित झाले.

अफगाणिस्तानने तिसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी केली. याच दरम्यान एक एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ९व्या षटकात रहमत शाह विचित्र पद्धतीने बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने फुल लेन्थ बॉल टाकला, ज्यावर रहमतुल्ला गुरबाजने गोलंदाजाच्या दिशेने शॉट खेळला. एनगिडीने चपळाई दाखवत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.

हेही वाचा – IND vs BAN : ‘रोहित भाईने अगोदरच सांगून ठेवले होते की तुम्हाला…’, ऋषभ पंतने कर्णधाराच्या ‘त्या’ मेसेजबद्दल केला खुलासा

एनिगिडीनेच्या हातावर चेंडू आदळल्यानंतर क्रीजबाहेर धावायला तयार असलेला रहमत शाहच्या खांद्यावर जाऊन आपटला आणि तिथून चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. लुंगी एनगिडीने हा विकेट पाहताच सेलिब्रेशन करायला सुरूवात केली तर रहमतला धक्काच बसला. त्याला तिसऱ्या पंचांनीही बाद दिले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. ६ चेंडूत एक धाव काढून तो बाद झाला. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात विचित्र रनआऊट आहे.

हेही वाचा – VIDEO: रोहित शर्माने आधी बेल्स बदलल्या, नंतर छू मंतर म्हणत असं काही केलं की दोन षटकांनंतर भारताला मिळाली विकेट

अफगाणिस्तानसाठी सामन्यात गुरबाजने ९४ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली, तर अल्लाह गझनफरने शेवटच्या १५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, नकाबा पीटर आणि फेहलुकवायो यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

अफगाणिस्तानने दिलेल्या १६९ धावांच्या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ३३ षटकांत लक्ष्य गाठत विजय मिळवला. आफ्रिकेकडून एडन मारक्रमने ६७ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी केली, तर ट्रिस्टन स्टब्सने ४२ चेंडूंत एक षटकार आणि एक चौकारासह नाबाद २६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेचा प्रथमच वनडे मालिकेत पराभव केला आहे.