आशिया चषकानिमित्ताने मुख्य प्रवाहात खेळण्याची संधी मिळालेल्या अफगाणिस्तानने दुसऱ्या लढतीत बांगलादेशवर २२ धावांनी मात करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ५ बाद ९० परिस्थितीतून अफगाणिस्तानने २५४ धावांची मजल मारली आणि त्यानंतर बांगलादेशला २२२ धावांत गुंडाळले.
अफगाणिस्तानची ५ बाद ९० अशी अवस्था असताना समीउल्ला शेनवारी आणि अश्गर स्टॅनिक्झई यांनी सहाव्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी साकारत अफगाणिस्तानला सुस्थितीत नेले. शेनवारीने १० चौकार व एका षटकारासह ८१ धावांची खेळी साकारली. तर अश्गरने ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ९० धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या आणि त्यांना ७२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
अफगाणिस्तानचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय
आशिया चषकानिमित्ताने मुख्य प्रवाहात खेळण्याची संधी मिळालेल्या अफगाणिस्तानने दुसऱ्या लढतीत बांगलादेशवर २२ धावांनी मात करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
First published on: 02-03-2014 at 05:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan script history beat bangladesh by 32 runs