Afghanistan beats India in Emerging teams Asia Cup: युवा भारतीय संघाचं इमर्जिंग एशिया कप स्पर्धेचं जेतेपद पटकावण्याचं स्वप्न अफगाणिस्तानविरुद्धच्या धक्कादायक पराभवाने अपुरं राहिलं. ओमान इथे झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत अफगाणिस्तान अ संघाने भारताच्या ताकदवान संघाला नमवण्याची किमया केली आणि अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत त्यांच्यासमोर श्रीलंकेचं आव्हान आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. सेदिउल्ला अतलने ५२ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारासह ८३ धावांची तडाखेबंद खेळी केली. झुबैद अकबारीने ४१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावांची खेळी केली. या जोडीने १३७ धावांची खणखणीत सलामी दिली. करीम जनतने २० चेंडूत ४१ धावा फटकावल्या. मोहम्मद इशाकने ७ चेंडूत १२ धावा केल्या. भारतातर्फे रसिख सलामने ३ विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, प्रभसिमरन सिंग हे भरवशाचे फलंदाज झटपट तंबूत परतले. आयुश बदोनीने २४ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. रमणदीप सिंगने ३४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६४ धावांची वेगवान खेळी केली परंतु त्याची झुंज अपयशी ठरली. निशांत सिंधूने २३ धावा करत त्याला चांगली साथ दिली. अफगाणिस्तानकडून ए.गनफझर आणि अब्दुल रहमान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan stun india in emerging asia cup cricket tournament psp