भारतात होणारा टी २० वर्ल्डकप करोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. मात्र या स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ खेळणार की याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. मात्र अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पर्धेत खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. टी २० विश्वचषक आणि ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजसोबत असलेल्या तिरंगी मालिकेसाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मीडिया व्यवस्थापक हिकमत हसन यांनी एएनआयशी बोलताना हे बाब स्पष्ट केलं आहे.
“हो, आम्ही टी २० विश्वचषकात भाग घेणार आहोत. यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. पुढच्या आठवड्यात काबुलमध्ये सराव सुरु होईल. आम्ही घरगुती टी २० स्पर्धाही पुढे नेण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे खेळाडूंना टी २० विश्वचषकापूर्वी चालना मिळेल. तसेच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेसाठी ठिकाण शोधत आहोत. आम्ही यासाठी श्रीलंका आणि मलेशिया देशांशी बोलत आहे. बघुया पुढे काय होतं?.”, असं संघ मीडिया व्यवस्थापक हसन यांनी स्पष्ट केलं.
Afghanistan will play T20 World Cup, preparations are on: Media manager
Read @ANI Story | https://t.co/cNy6MuEgn0#T20WorldCup pic.twitter.com/Ek3dF8eylM
— ANI Digital (@ani_digital) August 16, 2021
“आम्ही आमच्या खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार आहोत. त्यांच्यासाठी जे शक्य होईल ते करू. काबूलमध्ये जास्त परिणाम झालेला नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखं कारण नाही.”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
क्रिकेटपटू राशिद खानचं कुटुंब अफगाणिस्तानात अडकलं; बाहेर काढण्याचा मार्ग मिळेना!
टी २० वर्ल्डकपसाठी पात्रता फेरीचे सामने २३ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. या पात्रता फेरीत श्रीलंका, आयर्लंड आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहे. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या पात्रता फेरीतून चार संघ सुपर-१२ साठी पात्र ठरणार आहेत.