Afro Asia Cup Big Update: भारत वि पाकिस्तान हा सामना क्रिकेट जगतातील हायव्होल्टेज आणि सर्वाधिक पाहिला जाणारा सामना आहे. चाहते कायमच भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पण आता पुन्हा एकदा दोन दशकांनंतर दोन्ही संघातील खेळाडूंना एकाच संघातून खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. आफ्रो आशिया कप ही स्पर्धा पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे. ज्यामध्ये भारत-पाकिस्तानचे संघ एकाच संघातून खेळताना दिसतील. या स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

२००७ मध्ये अखेरच्या वेळेस भारत आणि पाकिस्तानचे संघ आफ्रो आशिया कप मध्ये एकत्र खेळताना दिसले होते. आता १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भात आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे अंतरिम अध्यक्ष म्हणजे ACA, तवेंगवा मुकुहलानी यांनी ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी एक मोठा अपडेट दिला आहे.

Sunil Gavaskar Prediction on Border Gavaskar Trophy
Sunil Gavaskar : ‘टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० ने जिंकूच शकत नाही, जर जिंकली तर मला…’, भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IND vs PAK Hong Kong Super 6 Pakistan Beat India by 7 Wickets Robin Uthappa Manoj Tiwary
IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – Virat Kohli Birthday: विराट, वामिका, अकाय…; अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला दोन्ही मुलांबरोबरचा फोटो, कोहलीच्या वाढदिवशी खास पोस्ट

६ सदस्यीय समितीची स्थापना

आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनने आफ्रो-आशिया चषक पुन्हा सुरू करण्यासाठी ६ सदस्यांची अंतरिम समिती देखील स्थापन केली आहे जेणेकरून स्पर्धा आयोजित करण्याची प्रक्रिया पुढे नेता येईल. आफ्रो-आशिया चषक आयोजित करण्यासाठी सर्वात आधी आशियाई क्रिकेट परिषदेशी बोलणे हे त्यांचे पहिले उद्दिष्ट असेल. ही स्पर्धा आतापर्यंत फक्त दोन वेळा खेळली गेली आहे, पहिल्यांदा २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने यजमानपद भूषवले होते, तर दुसऱ्यांदा २००७ मध्ये भारताने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

हेही वाचा – IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?

आफ्रो आशिया चषक या स्पर्धेची तिसरी आवृत्ती २००९ मध्ये केनियामध्ये होणार होती, परंतु अजूनही दोन दशकांनंतरही ही स्पर्धा होऊ शकली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेले संबंध, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिकाही खेळवली जात नाही.आफ्रो आशिया चषक या स्पर्धेची तिसरी आवृत्ती २००९ मध्ये केनियामध्ये होणार होती, परंतु अजूनही दोन दशकांनंतरही ही स्पर्धा होऊ शकली नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेले संबंध, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिकाही खेळवली जात नाही.

आफ्रो-आशिया चषक ही स्पर्धा एक आंतरखंडीय स्पर्धा आहे, जी आशिया आणि आफ्रिकेतील खेळाडूंनी तयार झालेल्या दोन संघांमध्ये आयोजित केली जाते, ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये ३-३ सामन्यांची मालिका खेळली जाते.

हेही वाचा – चॉकलेट बॉय विराटचे कधीही न पाहिलेले लहानपणीचे Photos व्हायरल, फोटोमध्ये दडलीय ‘चिकू’ नावामागची कहाणी…

ACA चे अंतरिम अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी, जे झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष देखील आहेत, यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, क्रिकेट व्यतिरिक्त, आफ्रो-आशिया चषक संस्थेसाठी आर्थिक पाठबळही आणतात, जे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे. आशिया क्रिकेट काऊंसिलमधील काहींशी आम्ही संपर्क साधला आहे आणि साहजिकच आफ्रिकन विभागांशीही चर्चा केली आणि तेही आफ्रो-आशिया चषक पुन्हा सुरू करण्यावर संमती दर्शवली आहे.

२००५ मध्ये, आफ्रो आशिया कप १-१ असा बरोबरीत राहिला होता आणि शेवटचा सामना रद्द करण्यात आला होता. या खेळाडूंमध्ये वीरेंद्र सेहवाग, शाहिद आफ्रिदी आणि सनथ जयसूर्या यांचा समावेश होता. संघाचे नेतृत्व इंझमाम-उल-हक करत होते आणि त्यात राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि आशिष नेहरा ही काही मोठी नावे होती.

२००७ मध्ये भारतात झालेल्या आफ्रो आशिया कपमध्ये आशियाने ३-० ने मालिका जिंकून आघाडी घेतली होती. २००७ मध्ये, शोएब अख्तर, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद युसूफ, झहीर खान, युवराज सिंग, एमएस धोनी, सौरव गांगुली आणि हरभजन सिंग या खेळाडूंचा सहभाग होता.

Story img Loader