Indian team overtook Australia to reach the top spot: आयसीसीकडून टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या १५ महिन्यांपासून पहिल्या क्रमांकाच्या कसोटी संघाचे स्थान राखणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी भारतासाठी ही मोठी गोष्ट आहे. डब्ल्यूटीसी २०२३ची फायनल ७ ते ११ जून दरम्यान लंडनमधील ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ आता १२१ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ ११६ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड ११४ रेटिंगसह तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका १०४ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सहाव्या तर श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज ८व्या तर बांगलादेश ९व्या स्थानावर आहे. झिम्बाब्वे १० व्या स्थानावर आहे.
गेल्या काही सामन्यांच्या अपडेटनंतर भारताला पहिले स्थान मिळाले.

आयसीसीने सोमवारी जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीत भारताला पहिले स्थान मिळाले आहे. गेल्या काही सामन्यांमुळे हा बदल झाला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताकडून १-२ अशा मालिका पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ अव्वल स्थानावर राहिला. परंतु आता क्रमवारीत बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघ १५ महिन्यांपासून पहिल्या स्थानावर होता, मात्र भारताने १५ महिन्यांची वर्चस्व संपवले आहे. टेस्ट व्यतिरिक्त टी-२० मध्येही भारत अव्वल आहे. मात्र, एकदिवसीय क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IPL Code of Conduct: कोणत्या नियमानुसार कोहली-गंभीरला ठोठावला दंड? कशी निश्चित केली जाते शिक्षा, जाणून घ्या

जय शाह यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले –

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “जगातील नंबर वन कसोटी संघ बनल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. जगातील नंबर वन कसोटी संघाचा दर्जा भारतीय संघाची मायदेशात आणि घराबाहेरील कामगिरीचे प्रतिबिंबित करतो. कसोटीशिवाय आम्ही टी-२० मध्येही नंबर वन आहोत.”