Indonesia open: भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने अ‍ॅरॉन चिया आणि सोह वुई यिक या मलेशियाच्या जोडीचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. सात्विक आणि चिराग या जोडीचे हे पहिले सुपर १००० वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. मलेशियाच्या जोडीविरुद्ध ७ वेळा पराभूत झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी पहिला विजय मिळवला आहे. याआधी अ‍ॅरोन चिया आणि सोह वुई यिक ही जोडी पुरुष दुहेरीत जगज्जेते होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडोनेशिया ओपनच्या दुहेरीत भारताचे हे पहिले विजेतेपद आहे. सात्विक आणि चिराग यांनी यापूर्वी सुपर १००, सुपर ३००, सुपर ५०० आणि सुपर ७५० चे विजेतेपद पटकावले आहेत. सर्व सुपर टायटल जिंकणारी ही पहिली भारतीय जोडी आहे. याआधी पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने २०१७ मध्ये विजेतेपद पटकावले होते.

पहिला गेम भारतीय जोडीने जिंकला

भारताच्या सात्विकसाईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पहिला गेम जिंकला. मलेशियाच्या जोडीने सामन्याची दमदार सुरुवात केली. त्याच्याकडे ०-३ अशी आघाडी होती, त्यानंतर स्कोअर ३-७असा झाला. काही क्षणातच भारतीय जोडीने शानदार पुनरागमन करत ११-९ अशी आघाडी घेतली. यादरम्यान सात्विक आणि चिरागने सलग ६ गुण मिळवले. यानंतरही खेळ बराच काळ सुरूच होता. शेवटी, भारतीय जोडीने पहिला गेम १८ मिनिटांत २१-१७ असा जिंकला.

हेही वाचा: Rohit Sharma: रोहित WTC २०२५ पर्यंत कसोटी कर्णधारपदी कायम राहणार का? आकाश चोप्रा म्हणाला, “जर तो १००% असेल तर मग…”

दुसर्‍या गेममध्ये थोडा संघर्ष करावा लागला

कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन सात्विक आणि चिराग या जोडीला दुसऱ्या गेममध्ये अॅरॉन चिया आणि सोह वुई यिक यांच्याशी लढणे कठीण वाटले. एका टप्प्यावर सामना ५-५ असा बरोबरीत होता. मात्र त्यानंतर भारतीय जोडीने आघाडी घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या हाफच्या ब्रेकपर्यंत भारतीय जोडीकडे ११-८ अशी आघाडी होती. यानंतर सात्विक आणि चिरागने आपला खेळ उंचावला. त्यांची आघाडी २०-१४ अशी वाढली होती. पण यानंतर सात्विक आणि चिरागकडून चुका होऊ लागल्या. मलेशियाच्या जोडीने सलग ४ गुण मिळवले. मात्र अखेर भारतीय जोडीने २१-१८ असा गेम जिंकून जेतेपदावर नाव कोरले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 41 years satwiksairaj and chirag shetty created history by defeating the world champions and won the title of indonesia open avw
Show comments