Yashasvi Jaiswal’s video call to his father after his century: युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात केली आहे. जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून अनेक विक्रम केले. डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे डावखुऱ्या फलंदाजाने १७१ धावा केल्या आणि कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची विक्रमी भागीदारी केली. एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळविल्यानंतर तिसर्‍याच दिवशी यशस्वीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आता यशस्वी जैस्वालच्या वडिलांनी एक खुलासा केला आहे.

उत्तर प्रदेशातील भदोही येथील यशस्वी तरुण वयात आपल्या स्वप्नांसाठी मुंबईत आला. स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने त्याला ‘पानीपुरी’ विकावी लागली. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर यशस्वीने भारतीय वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता वडिलांना व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. यशस्वीचे वडील भूपेंद्र जैस्वाल भदोहीमध्ये पेंटचे छोटे दुकान चालवतात.

Cheteshwar Pujara will be seen doing commentary in the Border Gavaskar Trophy.
Cheteshwar Pujara : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराची एन्ट्री! अचानक मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह इतकेच सामने अन्…
Virat Kohli last Test series in Australia says Justin Langer
Virat Kohli : ‘ऑस्ट्रेलियन चाहत्यांनो, विराट कोहलीला शेवटचं बघा…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी कोचचं मोठं वक्तव्य, जाणून घ्या कारण
Babar Azam was brutally trolled by a group of spectators at Sydney during AUS vs PAK 2nd T20I
Babar Azam : ‘अरे, थोडी तरी लाज वाटू दे…’, चाहत्यांनी ऑस्ट्रेलियात बाबर आझमची उडवली खिल्ली; म्हणाले, ‘टी-२० मध्ये तुला…’
no alt text set
SL vs NZ : सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनात श्रीलंकेचा विजयरथ सुसाट! मायदेशात सलग सहाव्या मालिकेत फडकावली विजयी पताका
Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना जैस्वालच्या वडिलांनी सांगितले की, डॉमिनिका कसोटीदरम्यान भारतीय सलामीवीर यशस्वीने त्यांना पहाटे साडेचारच्या सुमारास फोन केला होता. भूपेंद्र जैस्वाल म्हणाले, “त्याने शतक झळकावल्यानंतर पहाटे साडेचार वाजता फोन केला होता. त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. मी पण रडलो. तो खूप भावनिक क्षण होता. तो बराच वेळ बोलू शकला नाही, तो थकला होता. त्याने मला फक्त विचारले, ‘तुम्ही आनंदी आहात ना बाबा?”

२१ वर्षीय युवा फलंदाज जैस्वाल हा पहिल्याच सामन्यात १५० धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे. जैस्वालने कर्णधार रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची विक्रमी भागीदारी केली. जैस्वालने आपल्या दीडशतकी खेळीदरम्यान ३८७ चेंडूत १७१ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात दीडशतक झळकावणारा तो पाचवा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – Ashes series 2023: ॲलेक्स कॅरीने जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त विकेटवर सोडले मौन; म्हणाला, “पुन्हा संधी मिळाली तर…”

कसोटी क्रिकेटच्या विश्वात पदार्पण केल्यानंतर जैस्वालने आपल्या कुटुंबाला मुंबईत एक आलिशान नवीन घर भेट म्हणून दिले आहे. २१ वर्षीय खेळाडू सध्या मुंबईत भाड्याच्या २ बीएचके फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहत होता. मात्र, आता जैस्वालने मुंबईत एक ५बीएचके फ्लॅट घेतला असून त्याने तो त्याच्या आई-वडिलांना भेट दिला आहे. जैस्वाल यांच्या कुटुंबाला या निर्णयामुळे खूप आनंद झाला आहे, जे त्यांच्या मुलाच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि वचनबद्धतेचे साक्षीदार आहेत.