श्रीलंकेचे खेळाडू आणि क्रिकेट मंडळ यांच्यातील वाद माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष सनथ जयसूर्या यांच्या मध्यस्थीने शमला असून बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना शुक्रवारपासून गॉल येथे होणार आहे.
श्रीलंकेच्या २३ क्रिकेटपटूंनी मंडळाच्या करारावर सही न करण्याची भूमिका घेत बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळणार नसल्याचे सांगितले होते.
सध्याचा कर्णधार महेला जयवर्धने याने अजूनही करारावर सही केली नसून तो या वेळी देशाबाहेर आहे. त्याचबरोबर त्याचे बोट दुखावले असल्याने पहिल्या कसोटी सामन्यातील संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही.
संघ : अॅन्जेलो मॅथ्यूज (कर्णधार), दिनेश चंडिमल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), तिलकरत्ने दिलशान, दिमुथ करुणारत्ने, कुमार संगकारा, लहिरु थिरीमाने, शिमडा इरांगा, कुशल परेरा, जीवन मेंडिस, किथुरुवान विथानांगे, अजंथा मेंडिस, नुवान कुलसेकरा, चनाका वेलगेदरा, सुरंगा लकमल, रंगना हेराथ आणि थरिंडू कौशल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा