Ambati Rayudu On Politics and CM YS Jagan Mohan Reddy: भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू आता राजकारणात नशीब आजमावणार आहे. रायुडू आंध्र प्रदेशातील कृष्णा किंवा गुंटूर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. खरे तर रायुडूने राजकीय खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचे आपले इरादे फार पूर्वीच स्पष्ट केले होते. अंबाती रायडू लवकरच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्ष वायसआर काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंबाती रायुडूने आयपीएल २०२३ नंतर क्रिकेटला अलविदा केला. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता, पण आता तो राजकारणात उतरणार आहे. आयपीएल २०२३ सीझनपूर्वी अंबाती रायडूने या सीझननंतर राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते पण याबाबत त्याने अजून काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याने वायएसआर कॉंग्रेस प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची दोनदा भेट घेतली आहे.

अंबाती रायडूच्या राजकारणात प्रवेशावर काय म्हणाले?

खरेतर, असे मानले जाते की वायएसआरसीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांना अंबाती रायडू याने निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे. मात्र, अंबाती रायुडू विधानसभा निवडणूक लढवणार की लोकसभेत नशीब आजमावणार हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. त्याचवेळी अंबाती रायडूने अलीकडेच वायएस जगनमोहन रेड्डी यांच्यामुळे राजकारणात येत असल्याचे म्हटले होते पण कधी येणार हे अद्याप त्याने सांगितले नाही. वायएस जगन मोहन रेड्डी हे माझ्यासारख्या अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. तो म्हणाला की, “मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी हे माझ्यासारख्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत, ज्यांना राजकारणात उतरायचे आहे त्यांना ते नक्कीच मदत करतील.”

हेही वाचा: Team India: बुमराह, अय्यर, पंतला वर्ल्डकप खेळवण्याची BCCI घाई करत आहे? माजी खेळाडू म्हणाला, “अपेक्षेपेक्षा जास्त…”

अंबाती रायडू गुंटूर जिल्ह्यातून येतो, गेल्या आठवड्यात त्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी प्रमुख वायएस जगनमोहन रेड्डी यांची दोनदा भेट घेतली होती. जगन पुढील निवडणुकीत रायुडूला उभे करण्यास उत्सुक असले तरी, त्याला विधानसभा का लोकसभा निवडणुकीत उभे करायचे की नाही हे त्यांनी अद्याप ठरवलेले नाही.

विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी रायडू नशीब आजमावू शकतो

जगनमोहन रेड्डींच्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे रायडूने सांगितले. एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते सर्व क्षेत्रांत विकासाचे नेतृत्व करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, रायुडूला विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी पोन्नूर किंवा गुंटूर पश्चिम क्षेत्रांपैकी एक निवडावा, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुचवले आहे. त्यांना वाटते की मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघ हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

हेही वाचा: Asian Games 2023: भारताला मोठा धक्का! सुवर्णपदक विजेती हिमा दास आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये रायडूने शानदार फटकेबाजी केली होती

इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायडूच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. अंतिम सामन्यात अंबाती रायडूची विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. त्याने ८ चेंडूत २३७.५०च्या स्ट्राईक रेटने १९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. या सामन्यापूर्वी रायुडूने ट्वीट करून निवृत्ती जाहीर केली होती.