Virender Sehwag said I need to change my prediction now: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि २०१९ विश्वचषक अंतिम फेरीतील न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडला विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर इंग्लंड संघाबाबत सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, या पराभवानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही इंग्लंड संघाच्या पराभवाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की आता त्याला आपला भाकीत मागे घ्यायचे असून इंग्लंडला टॉप-४ संघांमधून वगळायचे आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि गतवेळचा अंतिम फेरीत गेलेला न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान

या सामन्यात किवी संघाने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २८२ धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून न्यूझीलंडने हे लक्ष्य ३७ व्या षटकात केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले. न्यूझीलंडने ८२ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. या पराभवानंतर पहिल्याच सामन्यात इंग्लंडला नेट रनरेटचा मोठा फटका बसला.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिल खेळणार की नाही? राहुल द्रविडने त्याच्या प्रकृतीबाबत दिली लेटेस्ट अपडेट

इंग्लंडचा नेट रन रेट झाला खूपच खराब –

वीरेंद्र सेहवागने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी उपांत्य फेरीतील संघांबाबत भाकीत केले होते. ज्यामध्ये त्याने इंग्लंडला अंतिम ४ संघांमध्ये स्थान दिले होते. मात्र, आता त्याने इंग्लंडला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढले आहे. क्रिकबझवरील संभाषणादरम्यान सेहवाग म्हणाला, मी इंग्लंडला टॉप-४ मध्ये ठेवले होते पण माझ्या मते आता मला माझा भाकीत बदलण्याची गरज आहे.

आता माझे भाकीत बदलण्याची गरज –

क्रिकबझवरील संभाषणादरम्यान वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “मी इंग्लंडला माझ्या चार अव्वल संघांत ठेवले होते, पण मला वाटतं की, मला आता माझे भाकीत बदलण्याची गरज आहे. होय, ते अजून दोन सामने गमावू शकतात आणि तरीही उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. मात्र, त्यांचा नेट रनरेट कमालीचा घसरला आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल.”

हेही वाचा – PAK vs NED: पाकिस्तानने विश्वचषकाची विजयाने केली सुरुवात, पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सचा ८१ धावांनी उडवला धुव्वा

२०१९ च्या विश्वचषक फायनलचा बदला घेतला –

वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला, “विकेट बदलली नाही; न्यूझीलंडने चांगली फलंदाजी केली. इंग्लंडच्या फलंदाजांचे शॉट सिलेक्शन खराब होते. दुसरीकडे न्यूझीलंडने फक्त एक विकेट गमावली. दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत टिकले. कारण त्यांची शॉटची निवड खूप चांगली होती. यामुळे खूप फरक पडला. मी म्हणेन की या विश्वचषकात आम्ही आधीच अपसेट पाहिला आहे आणि त्यांनी २०१९ च्या विश्वचषक फायनलचा बदलाही घेतला आहे.”