विश्वविजेत्या इंग्लंडला बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप झाल्यानंतर इंग्लिश संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संघाच्या कामगिरीवर चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशात माजी खेळाडू वसीम जाफरने ट्विट करत मायकल वॉनला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

बरेच दिवस दिसला नाही –

मात्र, इंग्लिश संघाच्या या पराभवावर भारताचे माजी फलंदाज आणि पंजाब किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर यांनी माजी कर्णधार मायकल वॉनला ट्रोल केले. जाफरने ट्विटरवर त्याचा फोटो पोस्ट केला आणि टोमणा मारला, “हॅलो मायकल वॉन… खूप दिवसांपासून दिसला नाही.” जाफरचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर मायकल वॉनने त्याला प्रत्युत्तर दिले. वॉनने इंग्लिश कर्णधार जोस बटलरचा एक फोटो ट्विट केला, ज्यामध्ये त्याच्याकडे वर्ल्ड कप ट्रॉफी आहे. वॉनने या फोटोसोबत लिहिले, “मॉर्निंग वसीम…”

ते अजूनही जगज्जेता आहेत –

दुसरीकडे शैलेंद्र नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर वॉनला विचारले, जगज्जेते बांगलादेशकडून ३-० ने हरल्यावर ट्विट करा. या यावर प्रत्युत्तर देताना वॉन म्हणाला, ते अजूनही जगज्जेता आहेत. इंग्लंडला आता विश्वचषक शिखरावर जाण्याचे वेध लागले आहेत. ही एक चांगली गुणवत्ता आहे. यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच या सूटचे पालन केले पाहिजे.”

हेही वाचा – AFG vs PAK T20: ‘संघाला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने पहिले पाऊल…’, पीसीबीच्या निर्णयावर पाकिस्तानचा माजी कर्णधार संतापला

मायकल वॉन आणि वसीम जाफर यांच्यात त्यांच्या मतांवरून ट्विटरवर अनेकदा वाद झाले आहेत. या विजयासह बांगलादेशने इंग्लंडविरुद्ध कोणत्याही स्वरूपातील पहिला मालिका विजय मिळवला. विशेष म्हणजे हा क्लीन स्वीप होता.

Story img Loader