Mohammed Shami slams former Pakistan cricketer Hasan Raza’s over bizarre claims: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचषक २०२३ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने अवघ्या चार सामन्यांमध्ये १६ विकेट घेतल्या आणि टीम इंडियाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या आगमनाने टीम इंडियाची बॉलिंग लाइनअप, विशेषत: वेगवान गोलंदाजी वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने आधी न्यूझीलंड, नंतर इंग्लंड, श्रीलंका आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. या सर्व सामन्यांमध्ये शमीचे महत्त्वाचे योगदान होते. कदाचित पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझाला हे पचनी पडलं नसेल. त्यामुळे हसन रझाने भारतीय गोलंदाज आणि इतरा गोलंदाजांना वेगवेगळे चेंडू दिल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझा सध्या बीसीसीआय आणि टीम इंडियाविरोधात केलेल्या असभ्य वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. हसन रझाने सध्या सुरु असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये डीआरएसच्या वापराबाबत आयसीसी आणि बीसीसीआयवर पक्षपाताचा आरोप केला होता. याशिवाय भारतीय गोलंदाजांना आणि इतर गोलंदाजांना वेगवेगळे चेंडू देण्याचा आरोप केला होता, ज्यावर मोहम्मद शमीने आता सडेतोड उत्तर दिले आहे. खरेतर, पाकिस्तानवरील स्पोर्ट्स शो दरम्यान, हसन रझाला विचारण्यात आले की, चालू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय गोलंदाजांव्यतिरिक्त कोणताही गोलंदाज तितका प्रभावी का दिसत नाही. त्यावर हस रझाने वादग्रस्त वक्तव्य केले.
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय गोलंदाजांवर वेगवेगळे चेंडू देण्याचा आरोप केला, ज्यावर मोहम्मद शमीने आता चोख प्रत्युत्तर दिले आहे. खरेतर, पाकिस्तानवरील स्पोर्ट्स शो दरम्यान, हसन रझा यांना विचारण्यात आले की, चालू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय गोलंदाजांव्यतिरिक्त कोणताही गोलंदाज तितका प्रभावी का दिसत नाही.
हेही वाचा – World Cup 2023: सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी! सांगितले उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणत्या संघाशी होणार?
काय होते हसन रझाचे वक्तव्य?
एबीएन नावाच्या वाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान बोलताना रझा म्हणाला, “आम्ही पाहतोय की जेव्हा ते फलंदाजी करतात, तेव्हा ते खरोखरच चांगली फलंदाजी करतात आणि जेव्हा भारत गोलंदाजी करतो तेव्हा अचानक चेंडू काम करू लागतो. त्याच्या बाजूने ७-८ काठावर डीआरएस कॉल आले आहेत. सिराज आणि शमी ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करत होते, त्यावरून जणू काही आयसीसी किंवा बीसीसीआय त्यांना दुसऱ्या डावात वेगळे आणि शंकास्पद चेंडू देत आहेत, असे वाटत होते. चेंडूची तपासणी करणे आवश्यक आहे. कारण स्विंगसाठी चेंडूवर अतिरिक्त थर देखील असू शकतो.”आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही रझाला त्याच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – World Cup 2023: ग्लेन मॅक्सवेलची दुखापत किती गंभीर? ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने दिली अपडेट
मोहम्मद शमीने माजी क्रिकेटपटूला आठवण करून दिली की विश्वचषक ही आयसीसी स्पर्धा आहे, स्थानिक स्पर्धा नाही. मोहम्मद शमीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना लिहिले, “थोडी तरी लाज वाटू द्या. आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करा आणि निरुपयोगी मूर्खपणा बंद करा. कधीकधी इतरांच्या यशाचा आनंद घ्या. ही आयसीसीची विश्वचषक स्पर्धा आहे, तुमची स्थानिक क्रिकेट स्पर्धा नाही. तुम्ही पण खेळाडू होता ना? वसीम भाईने समजावले होते, तरी तुम्हाला समजले नाही. तुमचा खेळाडू, तुमच्या वसीम अक्रमवर विश्वास नाही, तुम्ही तुमची प्रशंसा करण्यात व्यस्त आहात सर, तुम्ही अगदी वाहवासारखे आहात.”