इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने धडाकेबाज कामगिरी करत तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला. याचं निमीत्त साधत आयसीसीने पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडला विजय मिळवून देण्यातही बेन स्टोक्सने महत्वाची भूमिका बजावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर सचिन तेंडुलकरच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिकेट विश्वचषकाच्या सोशल मीडियावर, सचिन आणि बेन स्टोक्सचा फोटो The greatest cricketer of all time – and Sachin Tendulkar या कॅप्शनने शेअर करण्यात आला. अ‍ॅशेल मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर आयसीसीने हाच फोटो पुन्हा एकदा, Told You so या कॅप्शनने शेअर करत भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.

भारतीय नेटकऱ्यांनीही आयसीसीच्या या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

यंदाचं वर्ष हे बेन स्टोक्ससाठी चांगलं गेलं आहे. सर्वात प्रथम इंग्लंडला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर, स्टोक्सने मानाच्या अ‍ॅशेस मालिकेतही इंग्लंडचं आव्हान कायम राखलं आहे.