India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाता चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदोर येथे शुक्रवारी पार पडला. ज्यामध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाकडून ९ विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यादरम्यान एक ऑस्ट्रेलियन चाहता भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या तसेच टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळताना दिसला.

सध्या एका ऑस्ट्रेलियन चाहत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो टीम इंडियाची अवस्था पाहून ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘झुकेगा नही साला’ हा प्रसिद्ध डायलॉग उच्चारताना दिसत आहे. एवढेच नाही तर हा चाहता पुष्पाच्या सिग्नेचर पोजची कॉपी करताना दिसला.
इंदोर कसोटी सामना तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी संपला. भारताने ऑस्ट्रेलियाला ७६ धावांचे लक्ष्य दिले होते, जे ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावूनच गाठले. इंदोरमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ १०९ धावांवर गारद झाला होता.

BPL 2025 Mahedi Hasan obstructing the field wicket
BPL 2025 : फिल्डरने सोडला कॅच… तरीही केलं अपील, अंपायरने फलंदाजाला दिलं आऊट, VIDEO होतोय व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Jasprit Bumrah Moment in BBL as Mark Waugh Points out Lockie Ferguson Unconventional Delivery Like Indian Pacer Video
VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह
IND vs AUS Who is Beau Webster Debutante who hit the winning four for Australia in his Sydney test in BGT 2025
IND vs AUS : पदार्पणात अर्धशतक अन् विजयी चौकार! कोण आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ब्यू वेबस्टर? सिडनी कसोटीत भारतासाठी ठरला डोकेदुखी
Sachin Tendulkar Praised Rishabh Pant Fiery Inning in Sydney Test Said He has rattled Australia from ball one
IND vs AUS: सचिन तेंडुलकरही ऋषभ पंतची वादळी खेळी पाहून भारावला, कसोटीत टी-२० स्टाईल पाहून म्हणाला; “त्याने ऑस्ट्रेलियाला…”
Yashasvi Jaiswal Sledges Sam Konstas Ask Him For Big Shot Video Viral IND vs AUS Sydney Test
IND vs AUS: “ओए कॉन्टास, काय झालं रे..?” यशस्वी जैस्वालने कॉन्स्टासला चिडवलं, चुकीचं नाव घेत अशी घेतली फिरकी; VIDEO व्हायरल
IND vs AUS : प्रसिध कृष्णाचं जबरदस्त कमबॅक! ॲलेक्स कॅरीचा उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल
Jasprit Bumrah stares down Sam Konstas After Usman Khwaja Wicket and Team India Aggressive Celebration Video viral
IND vs AUS: बुमराहचा जळता कटाक्ष अन् भारताचं आक्रमक सेलिब्रेशन! कॉन्स्टासने वाद घातल्यानंतर ख्वाजाच्या विकेटचा VIDEO व्हायरल

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९७ धावा केल्या होत्या. भारताला दुसऱ्या डावातही पुनरागमन करता आले नाही. त्यानंतर संपूर्ण संघ १६३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या ७६ धावांचे लक्ष्य मिळाले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत अजूनही २-१ ने पुढे आहे. या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये ९ मार्चपासून खेळवला जाणार आहे.

भारताच्या अडचणी वाढणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघ पुढचा सामना हरला तर समीकरण अधिकच गुंतागुंतेचे होईल. कारण त्यानंतर त्यांच्या हातात काहीच राहणार नाही. कारण भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. ज्यामध्ये भारताला प्रार्थना करावी लागेल की, न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेला दोन्ही सामन्यात पराभूत करावे किंवा किमान मालिका १-० ने जिंकावी.

हेही वाचा – Irani Cup 2023: यशस्वी जैस्वालने शतक झळकावत रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ फायनल जूनमध्ये होणार –

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला आहे. फायनल ७ ते ११ जून दरम्यान खेळवली जाईल, तर १२ जून हा स्पर्धेसाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंड संघाने भारताचा पराभव केला होता.

Story img Loader