Irfan Pathan trolled Pakistanis: आशिया कप २०२३ मधील सुपरफोर टप्प्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा २२८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आशिया चषकाच्या इतिहासातील हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. यानंतर भारताचे कौतुक होत असतानाच सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवली जाऊ लागली. अशात माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचे ट्विट सर्वत्र व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानला चिमटा काढच जोरदार ट्रोल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्ताविरुद्धच्या मोठ्या विजयासह, भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व कायम राखले. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यापासून भारताने पाकिस्तानविरुद्ध ५० षटकांचा सामना गमावलेला नाही. पाकिस्तानवर मोठा विजय मिळवल्यानंतर भारताने सुपर फोरच्या गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांची निव्वळ धावगती +४.५६० आहे, तर पाकिस्तान दोन सामन्यांतून दोन गुणांसह आणि -१.८९२ च्या निव्वळ धावगती सह तिसऱ्या स्थानावर आहे.

इरफान पठाणने पाकिस्तानच्या चाहत्यांना काढला चिमटा –

https://x.com/IrfanPathan/status/1701284107026833505?s=20

भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवल्यानंतर, माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने पाकिस्तानी चाहत्यांची खिल्ली उडवली. पठाणने त्याच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून एक मजेदार पोस्ट केली, जी इंटरनेटवर त्वरित व्हायरल झाली. माजी क्रिकेटरने लिहिले, “खूप शांतता आहे, असे दिसते की शेजाऱ्यांनी टीव्हीसह मोबाइल फोन तोडला आहे…”

हेही वाचा – IND vs PAK: ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी स्विमिंग पूलमध्ये केली मस्ती, कोहली-रोहितने केला डान्स, पाहा VIDEO

इरफान पठाणची पोस्ट पाकिस्तानी चाहत्यांना आणि तज्ञांना उद्देशून होती, ज्यांनी पहिल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय फलंदाजीची खिल्ली उडवली होती. तसेच दावा केला होता की भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणाला आणि बाबर आझमच्या फलंदाजीला घाबरतात.

हेही वाचा – IND vs PAK: ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी स्विमिंग पूलमध्ये केली मस्ती, कोहली-रोहितने केला डान्स, पाहा VIDEO

भारताने पाकिस्तानविरुद्ध नोदंवला ऐतिहासिक विजय –

भारताने रविवारी २४.१ षटकात १४७ धावा केल्या होत्या. सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने ५० षटकांत ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला ३२षटकांत आठ गडी गमावून केवळ १२८ धावा करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. अशा प्रकारे टीम इंडियाने २२८ धावांनी विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After indias historic victory irfan pathans post criticizing pakistan went viral in asia cup 2023 vbm
Show comments