Harare Sports Club Fire in Zimbabwe: हरारे स्पोर्ट्स क्लबला मंगळवारी रात्री आग लागली. हे स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक पात्रता सामने आयोजित केले जात आहेत. आगीच्या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. स्फोट होऊनही मैदानाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयसीसीच्या सुरक्षा पथकाने आणि झिम्बाब्वे क्रिकेटने केलेल्या तपासणीनंतर स्पर्धेसाठी त्याचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये पाहायला मिळाला. त्याआधी या मैदानावर झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स यांच्यात सामना झाला होता. स्टेडियमला ​​आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने तेथे पोहोचले. काही वेळातच आगीवरही नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या घटनेनंतर आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट अधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्टेडियमची पाहणी केली. यानंतर परिस्थिती सामान्य असल्याचे पाहून त्यांनी सामन्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वे क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियमच्या दक्षिण-पश्चिम स्टँडमध्ये आग लागली होती.

हेही वाचा – Ashes Series 2023: ऑली रॉबिन्सनवर रिकी पाँटिंग संतापला; म्हणाला, “१५ वर्षांपूर्वी मी काय केले याची त्याला…”

झिम्बाब्वेची आतापर्यंत शानदार कामगिरी केली –

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक पात्रता सामन्यांमधील अव्वल दोन संघांना या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या मेगा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. यजमान झिम्बाब्वेने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी दोन सामने खेळताना दोन्हीमध्ये शानदार विजय मिळवला आहे. याशिवाय दुसऱ्या गटात ओमानचा संघ पहिल्या स्थानावर आहे. पात्रता फेरीत श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघही सहभागी आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After inspecting fire at harare sports club in zim the icc decided to host the odi wc 2023 qualifiers matches here vbm
Show comments