Sourav Ganguly Statement on Pitch : विशाखापट्टणम कसोटी सामन्यादरम्यान माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होत आहे. आपल्या पोस्टमध्ये गांगुलीने भारतीय खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर का खेळत आहोत, असा सवालही त्यांनी केला आहे.फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळून फलंदाजीचा दर्जा नष्ट होत असल्याची कबुली सौरव गांगुलीने दिली आहे. गांगुलीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौरव गांगुलीने पोस्टमध्ये लिहले, “जेव्हा मी बुमराह शमी सिराज मुकेशला गोलंदाजी करताना पाहतो. मला आश्चर्य वाटते की, आम्हाला भारतात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टी का तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक सामन्यात चांगल्या विकेट्सवर खेळण्याचा माझा विश्वास दृढ होत आहे. अश्विन जडेजा, कुलदीप आणि अक्षर यांच्या बरोबरीने ते कोणत्याही खेळपट्टीवर २० विकेट्स घेतील. मागील ६ ते ७ वर्षात घरच्या मैदानावरील खेळपट्ट्यांमुळे फलंदाजीचा दर्जा घसरत आहे. त्यामुळे खेळपट्ट्या चांगल्या असणे खूप महत्त्वाचे आहे. तरी देखील भारत पाच दिवसात जिंकेल.”

वास्तविक, पहिल्या कसोटीत भारताचा इंग्लंडकडून २८ धावांनी पराभव झाला होता. हैदराबादच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंनाही मदत मिळाली पण त्यानंतरही भारतीय फलंदाजांना इंग्लिश फिरकी गोलंदाजांचा चांगला सामना करता आला नाही. त्यामुळे १९० धावांची आघाडी घेतल्यानंतरही भारताला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत गांगुलीने वळणावळणाच्या खेळपट्टीवर कसोटी सामने खेळण्याबाबत आपले मत मांडले आहे.

हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम यॉर्करवर ऑली पोप झाला क्लीन बोल्ड, पाहा VIDEO

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना खूप त्रास दिला आणि महत्त्वपूर्ण ६ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला. अशा परिस्थितीत भारतीय खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना फारसे महत्त्व न दिल्याबद्दल गांगुलीने एका पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After jasprit bumrahs fiery spell sourav ganguly poses big question about pitches in india vbm