12 years old video of Mahendra Singh Dhoni goes viral: ॲशेस मालिका २०२३ मध्ये, पाहुण्या संघ ऑस्ट्रेलियाने रविवारी लॉर्ड्स कसोटी जिंकून २-० अशी आघाडी घेतली. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असेल, पण पाहुण्या संघावर इंग्लिश चाहते चांगलेच संतापले. खरं तर, जॉनी बेअरस्टोला ॲलेक्स कॅरीने यष्टीच्या मागे रनआऊट केले, जेथे तिसऱ्या पंचाने या घटनेचा रिप्ले पाहिला आणि फलंदाजाला आऊट घोषित केले. पण इंग्लिश खेळाडू आणि इंग्लिश चाहते बेअरस्टोच्या रनआऊटला खेळ भावनेविरुद्ध असल्याचे म्हणत आहेत. या घटनेनंतर एमएस धोनीचा १२ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि चाहते माहीचे कौतुक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआउटनंतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला आहे. या घटनेवर दोन गट तयार झाले आहेत, त्यापैकी एकाचा असा विश्वास आहे की जॉनी बेअरस्टो नियमांनुसार आऊट आहे, ज्यामध्ये काहीही चुकीचे नाही, तर दुसरा गटाचे मत आहे की, बेअरस्टो जरी बाहेर क्रीज बाहेर असला तरी ते खेळ भावनेच्याविरुद्ध आहे. दरम्यान, आता महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२०११ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज इयान बेलही वादग्रस्त पद्धतीने आऊट झाला होता. वास्तविक, इऑन मॉर्गन आणि इयान बेल मैदानावर फलंदाजी करत होते. दरम्यान, इशांत शर्माच्या एका चेंडूवर मॉर्गनने लेग साइडच्या दिशेने शॉट खेळला.

हेही वाचा – Ashes Series 2023: विराट कोहलीकडून बेन स्टोक्सच्या खेळीचे कौतुक; म्हणाला, “मी बेन स्टोक्सला…”

चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला, तिथे प्रवीण कुमारने चेंडू अडवला आणि स्ट्रायकरच्या टोकाकडे परत फेकला. येथे इंग्लिश खेळाडूंना वाटले की, चेंडू सीमारेषेला लागला आहे, अशा परिस्थितीत ते रिलॅक्स झाले. दरम्यान, भारतीय क्षेत्ररक्षकाने चेंडूने स्टंपवरील बेल पाडल्या. भारतीय संघाने अपील केले आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांनी इयान बेलला रनआऊट घोषित केले.

इयान बेल बाद झाला आणि डावाचा ब्रेकही झाला. अशा परिस्थितीत ब्रेकनंतर मॉर्गनसोबत नवा फलंदाज मैदानात येईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण इथे इयान बेलच फलंदाजीला आला, तो महेंद्रसिंग धोनीमुळे. खरे तर धोनीला अशा प्रकारे विरोधी खेळाडूला बाद करणे योग्य वाटले नाही, त्यामुळे त्याने संघाची अपील मागे घेतली. त्यामुळेच आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. माहीसारखा कोणीच नाही हे या घटनेने सिद्ध होते.