विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये भारतीय पुरुषांपाठोपाठ महिलांनीही फ्री-स्टाइल प्रकारात निराशा केली. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या साक्षी मलिकचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्याचबरोबर प्रियांका सिंग, पूजा धांडा आणि सुमान कुंडू यांनाही पराभव पत्करावा लागला.
६० किलो वजनी गटामध्ये साक्षीने सेनेगलच्या अन्ता साम्बोऊला ४-१ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पण उपांत्यपूर्व फेरीत साक्षीला फिनलँडच्या पेत्रा मेरीट ओलीकडून १-३ असा पराभव स्वीकारावा लागला. ५५ किलो वजनी गटामध्ये मंगोलियाच्या अल्टान्टेसेसेगने पूजावर ४-० असा विजय मिळवला. ४८ किलो वजनी गटामध्ये प्रियांकाला रोमानियाच्या इमिला अ‍ॅलिनाकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागला. ६९ किलो वजनीगटामध्ये रशियाच्या नतालिया व्होरोबेव्हाने सुमनवर ५-० असा विजय मिळवला.

Story img Loader