India vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषकाच्या तिसऱ्या सामन्यात शनिवारी (२ सप्टेंबर) भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. अ गटातील या आवृत्तीतील भारताचा हा पहिलाच सामना आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ आपला दुसरा सामना खेळत आहे. पहिल्या सामन्यात त्याने नेपाळचा पराभव केला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शाहीन आफ्रिदीने भारताला दोन मोठे धक्के दिले असून रोहित शर्मा आणि विराट कोहली तंबूत परतले आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्पर्धा सुरूच आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. मात्र, टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मानंतर विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. शाहीन आफ्रिदीने विराट कोहलीला बाद केले. विराट कोहलीने ७ चेंडूत केवळ ४ धावा करून तंबूत परतला आहे. तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माने २२ चेंडूत ११ धावा केल्या.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
मात्र, विराट कोहली बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. तत्पूर्वी, शाहीन आफ्रिदीने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
पावसानंतर लगेचच भारताला मोठा झटका बसला आहे. पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने इनस्विंग चेंडूवर रोहितला क्लीन बोल्ड केले. २०२१च्या टी२० विश्वचषकादरम्यान त्याने रोहितला नेमका तोच चेंडू टाकला होता आणि त्याला बाद केले होते. सातव्या षटकात २७ धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. शाहीन आफ्रिदीचा कहर दिसत आहे. रोहित शर्मानंतर त्याने विराट कोहलीला बाद केले. विराट हा तोच खेळाडू आहे ज्याने गेल्या वर्षी टी२० विश्वचषकात टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. शाहीनने सलग दोन षटकांत भारताच्या दोन प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. सात षटकांनंतर भारताने दोन गडी गमावून ३० धावा केल्या होत्या.
सामन्यात सद्य परिस्थिती काय आहे?
भारताला तिसरा धक्का बसला आहे. दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर हारिस रौफने श्रेयस अय्यरला बाद केले. नऊ चेंडूत १४ धावा करून अय्यरला फखर झमानने झेलबाद केले. अशाप्रकारे भारतीय संघाने पहिल्या १० षटकांत आपले तीन फलंदाज गमावले. पावसाने पुन्हा सामन्यात व्यत्यय आणला असून दुसऱ्यांदा सामना थांबवण्यात आला आहे. भारताने ११.२ षटकात तीन विकेट्स गमावत ५१ धावा केल्या आहेत. शुबमन गिलसोबत इशान किशन नाबाद आहे. गिलने २४ चेंडूत सहा आणि इशानने ६ चेंडूत २ धावा केल्या.