आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी प्रत्येक संघांनी संघ बांधणीची तयारी जोरदार सुरु केली आहे. असे असतानाच केकेआर संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण सॅम बिलिंग्ज, पॅट कमिन्स यांच्यानंतर इंग्लंडच्या एका खेळाडूने आयपीएल २०२३ मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केकेआर संघाला तिसरा झटका बसला आहे.
टी-२० विश्वचषक विजेता संघ इंग्लंडचा खेळाडू अॅलेक्स हेल्स इंडियन प्रीमियर लीग २०२३ मधून बाहेर पडला आहे. त्याची फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) ने मंगळवारी ही माहिती दिली. हेल्स देशबांधव सॅम बिलिंग्ज आणि ऑस्ट्रेलियन कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्ससह आयपीएलच्या पुढील हंगामाला मुकणार आहे.
केकेआरने ट्विटमध्ये म्हटले आहे की,”वैयक्तिक आणि राष्ट्रीय संघाच्या वचनबद्धतेमुळे पुढील वर्षीची आयपीएल न खेळण्याचा निर्णया सॅम बिलिंग्ज, पॅट कमिन्स आणि अॅलेक्स हेल्स यांनी घेतला आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा आदर करतो. तसेच या सर्वांना वाटचालीसाठी शुभेच्छा.”
गतविजेते उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरल्यामुळे स्थानिक पातळीवर आयसीसी टी-२० विश्वचषकात खराब कामगिरी करणाऱ्या २९ वर्षीय वेगवान गोलंदाजाला कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) मेगा लिलावात ७.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. या वर्षाच्या सुरुवातीला पाच सामने खेळून सात विकेट घेतल्या.
आदल्या दिवशी, २९ वर्षीय कमिन्सने आंतरराष्ट्रीय वर्कलोडमुळे पुढील वर्षी होणारी आयपीएल स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला. कमिन्स म्हणाला, पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलला मुकण्याचा कठीण निर्णय मी घेतला आहे. पुढील १२ महिन्यांचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनी भरलेले आहे, त्यामुळे ऍशेस मालिका आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी थोडी विश्रांती घेतली जाईल.
कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने आयपीएल २०२३ च्या हंगामाच्या लिलावपूर्वी एकून १६ खेळाडूंना सोडले आहे. त्याचबरोबर तीन खेळाडूंना इतर संघाकडून रिटेन केले आहे.
हेही वाचा – IPL 2023: केकेआरला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू देखील आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही
सोडलेले खेळाडू (१६): पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, अमन खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, आरोन फिंच, अॅलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंग, रमेश कुमार, रसिक सलाम, शेल्डन जॅक्सन.
ट्रेड खेळाडू: शार्दुल ठाकूर, रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन.
सध्याचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग.
पर्समध्ये शिल्लक पैसे: ७.०५ कोटी.