Suryakumar Yadav’s Insta Story Viral : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. २ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे दोन अनुभवी खेळाडू या सामन्यात खेळू शकणार नाहीत. त्यांच्या जागी मुंबईचा फलंदाज सरफराज खान, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि फिरकीपटू सौरभ कुमार यांची निवड करण्यात आली आहे. सरफराजच्या निवडीनंतर सूर्यकुमार यादवने एक खास इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत. रविवारी पहिल्या कसोटीत जडेजाच्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती, तर राहुलने उजव्या मांडीत दुखत असल्याचे सांगितले आहे. बीसीसीआय एका निवेदनात म्हटले आहे की, ‘रवींद्र जडेजा आणि राहुल २ फेब्रुवारी २०२४ पासून विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक दोन्ही खेळाडूंच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.’

निवड समितीने दुसऱ्या कसोटीसाठी मुंबईचा फलंदाज सरफराज खान, डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात समावेश केला आहे. पहिल्या कसोटीत २८ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारत पाच सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. सरफराज खानला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने सोशल मीडिया पोस्टद्वारे सरफराज खानला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – IND vs SA : ‘…म्हणून विराट-जडेजाला बॅटने मारण्याची दिली होती धमकी’, माजी क्रिकेटपटू डीन एल्गरचा धक्कादायक खुलासा

सूर्यकुमार शेअर केली खास इन्स्टा स्टोरी –

सूर्यकुमार यादवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सरफराज खानसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, ‘मेडन इंडिया कॉल, उत्सव की तैयारी करो.’ सरफराजने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सुमारे ७० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ४५ प्रथम श्रेणी सामन्यांच्या ६६ डावांमध्ये ३९१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३०१ धावांची नाबाद खेळीही खेळली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १४ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. अलीकडेच भारत अ संघाकडून खेळताना सरफराज खाननेही १६१ धावांची खेळी केली होती.

हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड झालेला सौरभ कुमार कोण आहे? जाणून घ्या

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After sarfraz khans selection in the indian team suryakumar yadav said maiden india call prepare for the celebration vbm
Show comments