Sachin Tendulkar Praises Shubman Gill : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर २५५ धावा केल्या. त्याचबरोबर इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्याने दुसऱ्या डावात शतक झळकवणाऱ्या शुबमन गिलचे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुबमन गिलने पहिल्या डावात ३४ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात होते. तसेच त्याला संघातून बाहेर करावे, अशी मागणी जोर धरत होती. मात्र, या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने संयमाने फलंदाजी करत शतक झळकावले. यानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवरून गिलच्या शतकाचे कौतुक केले. सचिन तेंडुलकरने लिहिले, ‘शुबमन गिलची ही खेळी कौशल्याने परिपूर्ण होती, त्याने योग्य वेळी शतक झळकावल्याबद्दल अभिनंदन.’

अकरा महिन्यानंतर शुबमनने झळकावले शतक –

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती होती. मात्र शुबमन गिलने संयमाने फलंदाजी करत १३२ चेंडूत शतक झळकावले आणि भारताचा दुसरा डाव सावरला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. हे शुबमन गिलच्या कसोटी कारकीर्दीतील तिसरे शतक ठरले. शुबमनने यापूर्वी मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.

हेही वाचा – IND vs ENG 2nd Test : भारताने इंग्लंडसमोर ठेवले ३९९ धावांचे लक्ष्य, शुबमन गिलने झळकावले शतक

भारताने इंग्लंडसमोर ठेवले ३९९ धावांचे लक्ष्य –

दुसऱ्या डावात भारतीय संघ २५५ धावांत गारद झाला. रेहान अहमदने अश्विनला बाद करून भारताचा डाव रोखला. आता इंग्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी ३९९ धावांचे लक्ष्य आहे. या डावात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक १०४ धावा केल्या. अक्षर पटेलने ४५ आणि रविचंद्रन अश्विनने २९ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार विकेट्स घेतल्या. रेहम अहमदला तीन, जेम्स अँडरसनला दोन आणि शोएब बशीरला एक विकेट मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After shubman gills century against england sachin tendulkar praised him on social media vbm