भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. या सामन्याच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी करताना ५ बळी घेतले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाने पत्रकार परिषदेत नागपूरच्या खेळपट्टीबाबत मोठा खुलासा केला.
रवींद्र जडेजाने म्हणाला की, ” मला गोलंदाजी करताना चांगले वाटले. रिदम होता आणि कसोटी मालिकेसाठी मी काय तयारी करत होतो, चेंडू हातातून चांगला सुटत होता. चांगली लाईन आणि लेंथ चांगली होती. कारण विकेटवर जास्त उसळी नव्हती, त्यामुळे मी विकेट टू विकेट गोलंदाजी करत होतो. बाऊन्स नसल्यामुळे बोल्ड आणि एलबीडब्ल्यू होण्याची शक्यता निर्माण होतील, लकीली तसेच घडले. त्यामुळेच मी माझ्या गोलंदाजीवर खूश आहे.”
जडेजाने ८ मेडन ओव्हर्स टाकल्या आणि ५ बळी घेतल्या –
रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी पहिल्या दिवशी सर्वाधिक २२ षटके टाकली. त्याने ४७ धावांत ५ बळी घेतले. ८ षटके मेडन राहिली. जडेजाशिवाय रविचंद्रन अश्विनने ३ बळी घेतले आहेत. १-१ बळी शमी आणि सिराजच्या नावावर राहिला.
हेही वाचा – IND vs AUS 1st Test: विराट कोहलीने स्मिथचा झेल सोडताच नोंदवला लाजिरवाणा विक्रम; ‘या’ क्लबमध्ये झाला सामील
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची स्थिती –
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नागपुरात खेळल्या जात असलेल्या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांत गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज खेळी करत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाला ७७ धावांपर्यंत नेले आहे. केएल राहुल २० धावा करून बाद झाला. रोहित शर्मा ५६ धावांवर नाबाद आहे.