Hardik Pandya shared a video from setback to comeback on Instagram : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बहुतांश सामन्यांमध्ये त्याने बॅट आणि बॉल या दोन्ही बाजूंनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हार्दिक पंड्याने अंतिम षटक टाकले, ज्यात त्याने १६ धावांचा बचाव केला. हार्दिकने सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने म्हटले की, कमबॅकला नेहमी सेटबॅकपेक्षा उत्तम बनवा.

भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचे योगदान मोलाचे होते. आता त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, “आपल्या कमबॅकला नेहमी सेटबॅकपेक्षा उत्तम बनवा.” काही महिन्यांपूर्वीपर्यंत आयपीएल २०२४ दरम्यान त्याला प्रत्येक स्टेडियममध्ये चाहत्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र, मोठ्या मंचावर त्याने चमत्कार कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

टी-२० विश्वचषकातील हार्दिक पंड्याची कामगिरी –

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये हार्दिक पंड्याने हेनरिक क्लासेनची विकेट घेतली, जी भारतासाठी खूप महत्त्वाची होती. त्याचबरोबर हार्दिकने शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरची विकेट घेत सामन्याला मोठी कलाटणी दिली. हार्दिक पंड्याने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ डावात १५१.५७ च्या स्ट्राइक रेटने १४४ धावा केल्या. त्याने अर्धशतकही झळकावले. त्याने आठ डावात ११ विकेट्स घेतल्या. फायनलमध्ये विराट कोहलीच्या ७६ धावांमुळे भारताने २० षटकांत सात गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात हार्दिक पंड्याचे तीन आणि जसप्रीत बुमराहच्या दोन विकेट्सच्या जोरावर भारताने आफ्रिकेला २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावांवर रोखले.

हेही वाचा – WCL 2024 : शीख धर्माबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कामरान अकमल-हरभजन सिंग आमनेसामने, VIDEO व्हायरल

बार्बाडोसमधील वादळामुळे उशीर झालेला भारतीय संघ चॅम्पियन बनल्यानंतर तीन दिवसांनी मायदेशी परतला. गुरुवारी सकाळी दिल्लीत उतरल्यानंतर टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी मुंबईत विजयी परेड काढली. यानंतर वानखेडे स्टेडियमवर सर्व टीम इंडियाचा सत्कार समारंभ पार पडला.

Story img Loader