BCCI shared a video of Team India’s dressing room: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाने सर्व भारतीय आनंदी आहेत. अहमदाबादमध्ये चाहत्यांनी विजयाचा जल्लोष केला. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनीही सामना संपल्यानंतर खूप धमाल केली. यादरम्यान हार्दिक पांड्या अँकर झाला आणि त्याने सर्व खेळाडूंशी चर्चा केली. त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजासोबत खूप धमाल केली. भारतीय खेळाडूंचा हा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला असून चाहत्यांना तो प्रचंड आवडत आहे.
टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या सामन्यानंतर बीसीसीआय मीडिया टीमचा अँकर बनला. त्यानंतर तो थेट रोहित शर्माला त्याच्या फलंदाजीबद्दल विचारण्यासाठी गेला. असा सामना जिंकणे ही चांगली भावना असल्याचे शर्मा यांनी सांगितले. हार्दिकने लगेचच हस्तक्षेप करत त्याला निकाल सोडून फलंदाजीबद्दल बोलण्यास सांगितले.
हार्दिकने रोहितला सांगितले की, “तुम्ही प्लेस्टेशनवर फलंदाजी करत आहेस, असे वाटले.” प्रत्युत्तरात रोहित म्हणाला की, मी दोन वर्षांपासून अशीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज यशस्वी झालो. रोहित त्याच्या खेळीबद्दल बोलताना म्हणाला, “गेल्या दोन वर्षांपासून मी अशीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण खेळपट्टी इतक्या चांगल्या आहेत की मला फक्त माझे शॉट्स खेळायचे आहेत. मला माहित आहे की माझे शतक हुकले, पण मी आता त्या मानसिकतेसह येत नाही.”
हेही वाचा – IND vs PAK सामन्याने रचला इतिहास, मोडला आयपीएल फायनलचा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिला सामना
रोहित शर्मानंततर हार्दिक पांड्या ड्रेसिंग रुममध्ये जातो, तेव्हा रवींद्र जडेजा फोनवर बोलत असतो आणि हसून म्हणतो आता कॉल सुरु आहे. तितक्यात हार्दिक पांड्या म्हणतो फोन कट कर. तसेच हार्दिक त्याला विचारतो की गोलंदाजीबद्दल काही बोलायच आहे का? तू इतकी सरळ गोलंदाजी करत आहेस. प्रत्युत्तरात रवींद्र जडेजा म्हणतो, “खूप छान वाटले. पाकिस्तानने पहिल्यांदा १५५ धावांवर दोन गडी गमावले होते आणि १९१ धावांवर सर्वबाद झाले. त्यानंतर आम्ही चांगल्या प्रकारे पुनरागमन केले. एक गोलंदाजी विभाग म्हणून आम्ही शानदार गोलंदाजी केली. तसेच सर्वांनी २-२ विकेट्स घेतल्या.” यानंतर पुढे या व्हिडीओत हार्दिक पांड्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी संवाद साधला. त्यानंतर हार्दिकने टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहशी चर्चा केली. सर्वात शेवटी हे तिघे एकमेकांची गळाभेट घेतात.