R. Ashwin on WTC Final: सध्या रविचंद्रन अश्विनचा हा कठीण काळ चालू आहे. कसोटी इतिहासात पहिल्या क्रमांकावर असलेला सर्वोतम गोलंदाज असूनही त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शेवटच्या सामन्यातून वगळण्यात आले. कसोटी इतिहासातील अव्वल १० विकेट्स घेणार्‍यांपैकी असलेल्या अश्विनला या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये दुर्लक्षित केले गेले, हा या महान फिरकीपटूसाठी मोठा धक्का होता. अशा कठीण काळात, कुटुंबाव्यतिरिक्त, खेळाडू सहसा आपल्यासोबत असणाऱ्या आपल्याच संघात असणाऱ्या मित्रांकडून समर्थन मिळेल अशी अपेक्षा करतात. मात्र, अश्विनला डब्ल्यूटीसीच्या फायनल बाबतीत विचारले असता अश्विनने भारतीय क्रिकेटचे दुःखद वास्तव उघड केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे झालेल्या WTCच्या फायनलमध्ये उमेश यादवला संघात स्थान दिले गेले आणि त्याच कारणासाठी अश्विनला डावलले गेले होते, या रणनीतीवर कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर नाराज झालेल्या दिग्गज क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली होती. त्याचा परिणाम म्हणजे भारताने तब्बल २०९ धावांनी सलग दुसऱ्यांदा WTC फायनलमध्ये पराभव पत्कारावा लागला, त्यानंतर हा विषय बराच काळ चर्चेत होता.

इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत जेव्हा अश्विनला विचारले गेले की तो त्याच्या संघातील खेळाडूंकडून मदतीसाठी आशा ठेवतो का किंवा त्याच्या कोणत्याही सहकाऱ्यांशी स्पष्ट संभाषण करतो का? तेव्हा अश्विनची पहिली प्रतिक्रिया होती, “हा एक गहन विषय आहे.” त्याने स्पष्ट केले की टीम इंडियामधील प्रत्येक जागेसाठी प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे ‘मैत्री’ या शब्दांना टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अगदी कमी महत्वाचे स्थान आहे.

हेही वाचा: Indonesia open: ४१ वर्षानी सात्विक-चिराग जोडीने रचला इतिहास! जगज्जेत्यांना हरवून इंडोनेशिया ओपनच्या विजेतेपदावर कोरले नाव

मित्र आणि सहकारी याबाबतीत बोलताना अश्विन म्हणतो, “हे असे युग आहे की प्रत्येकजण केवळ सहकारी आहे. एकेकाळी जेव्हा क्रिकेट खेळले जायचे तेव्हा तुमच्या संघातील सर्व खेळाडू हे मित्र होते. आता ते केवळ सहकारी आहेत. मित्र आणि सहकारी यामध्ये खूप फरक आहे कारण इथे खेळाडू फक्त स्वतःला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि स्वत:चे स्थान संघात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. जी दुसरी व्यक्ती तुमच्या उजवीकडे किंवा डावीकडे बसलेली आहे तिच्याकडे बघण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही. त्यामुळे ‘ठीक आहे, बॉस, तुम्ही काय करत आहात’ याच्याशी कोणालाही देणेघेणे नाही.”

अश्विनने असे मत व्यक्त केले की जेव्हा खेळाडू त्यांचे कौशल्य आणि त्यांचा अनुभव शेअर करतात तेव्हा ते संघासाठी चांगले असते, परंतु भारतीय संघात याच्या जवळपास काहीही घडत नाही. त्यामुळे त्याने याचा सारांश सांगितला की “हा एक वेगळा प्रवास आहे आणि जो तुमचा तुम्हालाच पार करायचा आहे.”

अश्विन पुढे बोलताना म्हणतो, “खरं तर, माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही अशा गोष्टी शेअर करता तेव्हा क्रिकेट अधिक चांगले होते. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे कौशल्य आणि दुसऱ्या व्यक्तीचा प्रवास समजून घेता तेव्हा ते तुमच्यासाठी देखील चांगले असते. पण ते जितके घडले पाहिजे त्याच्या जवळपास कुठेही घडत नाही. तुम्हाला मदत करण्यासाठी येथे कोणीही येणार नाही. हा एक वेगळा एकाकी प्रवास आहे. अर्थातच, तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही व्यावसायिकापर्यंत तुम्ही पोहोचू शकता, एखाद्या प्रशिक्षकाशी संपर्क साधू शकता, तुम्ही पैसे देऊ शकता आणि जाऊ शकता आणि सराव करू शकता, त्यांच्याकडून शिकून घेण्यासाठी प्रयत्न करू शकता. परंतु कधीकधी आपण विसरतो की क्रिकेट हे स्वत:च्या चुकांमधून शिकण्याचा खेळ आहे.”

हेही वाचा: Rohit Sharma: रोहित WTC २०२५ पर्यंत कसोटी कर्णधारपदी कायम राहणार का? आकाश चोप्रा म्हणाला, “जर तो १००% असेल तर मग…”

कसोटी क्रिकेटमधून पुढे जाताना आता WTC फायनलनंतर जुलैच्या मध्यापर्यंत भारताची कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका नसल्यामुळे, अश्विनने आता आपले लक्ष तामिळनाडू प्रीमियर लीगकडे वळवले आहे जिथे तो सध्या २०२३च्या हंगामात डिंडीगुल ड्रॅगनचे नेतृत्व करतो आहे. अश्विनसारखा फिरकीपटू टीम इंडियाने दुर्लक्षित करता कामा नये असे सर्वच स्तरातील खेळाडूना प्रकर्षाने जाणवते मात्र टीम इंडियाचे प्रशिक्षक आणि कर्णधार नेमके काय करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the wtc final ashwin revealed the sad reality of team india saying the players in the team were friends before but now only colleagues avw
Show comments