Agha Ali Salman messaged Kohli on Instagram : आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा नवीन उल हक यांच्यातील वाद खूप चर्चेत राहीला होता. आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यात विराट आणि नवीन यांच्यात वाद झाला होता. यानंतर विराटचा एलएसजीचा मार्गदर्शक गौतम गंभीरसोबतही वाद झाला. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात विराट कोहली आणि नवीन उल हक पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान चाहत्यांनी नवीनसमोर कोहली-कोहलीच्या घोषणा दिल्या. मात्र, विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी एकमेकांना मिठी मारली आणि वाद संपवला. पण हा वाद झाला, तेव्हा पाकिस्तानचा खेळाडू आगा अली सलमानने विराटला इन्स्टावर मेसेज केला होता.

अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार इमाम-उल-हकने दावा केला होता की, जेव्हा विराट कोहलीचे आयपीएलमध्ये नवीन उल हकसोबत भांडण झाले होते, तेव्हा त्याचा सहकारी आगा अली सलमानने विराटला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता. इमाम म्हणाले, ‘हा वाद खूप व्हायरल झाला होता. भांडणानंतर आगा अली सलमानने विराट कोहलीला इंस्टाग्रामवर मेसेज केला आणि म्हणाला, ‘कोहली बच्चे इजी हो जा.’ म्हणजेच आगा सलमानने कोहलीला ‘बच्चे’ म्हटले होते. सलमानचे पदार्पण नुकतेच झाले आहे, तर कोहलीचे नाव महान खेळाडूंमध्ये येते. अशा परिस्थितीत सलमानचे हे बोलणे चाहत्यांना आवडले नाही.

Champions Trophy 2025 Suresh Raina Prediction For Player of the Tournament prefers Shubman Gill
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सुरेश रैनाचं मोठं भाकीत! विराट-रोहित नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरणार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Who Is Himanshu Sangwan He Clean Bowled Virat Kohli on Ranji Trophy Return
Ranji Trophy: विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान आहे तरी कोण? सेहवागचा आहे शेजारी
Virat Kohli Clean Bowled on Ranji Trophy Return
Virat Kohli Ranji Trophy: विराट कोहलीच्या पदरी रणजीतही निराशा! स्टंप्सच्या कोलांटउड्या, पाहा VIDEO
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी
Virat Kohli Hugs Childhood Friend Shawez Khan During Ranji Trophy Practice
Virat Kohli: “बाबा…विराट कोहली खरंच तुमचा मित्र आहे?”, विराटने दिल्लीत बालपणीच्या मित्राला पाहताच मारली मिठी; मित्राचा लेक झाला चकित
Virat Kohli net practice with Sanjay Bangar video viral ahead Ranji Trophy match
Virat Kohli Net Practice : विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये परतण्यापूर्वी गाळला घाम, नेटमध्ये सराव करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Noman Ali becomes first Pakistan spinner to take Test hattrick In PAK vs WI 2nd Test
PAK vs WI: ३८ वर्षीय खेळाडू ठरला पाकिस्तानकडून हॅटट्रिक घेणारा पहिला फिरकिपटू, पाहा VIDEO

नवीनने सांगितले की त्याच्या आणि विराटमधील भांडण कसे सोडवले गेले –

एलएसजीला दिलेल्या मुलाखतीत या घटनेबद्दल बोलताना नवीन उल हकने सांगितले की विराट कोहलीने त्यांच्यातील गोष्टी कशा सोडवल्या. विश्वचषक सामन्यादरम्यान झालेल्या संभाषणाबद्दल बोलताना नवीन म्हणाला, कोहलीने मला सांगितले की हे संपवूया. मी म्हणालो हो इथेच संपवूया. म्हणून आम्ही पुन्हा एकमेकांकडे बघून हसलो आणि गळा भेट घेतली. त्यानंतर कोहलीने मला सांगितले की, यानंतर चाहते तुला माझ्या नावाने चिडवणार नाहीत. यानंतर विराटनेही चाहत्यांना नवीनला पाठिंबा देण्यास सांगितले.

हेही वाचा – IND vs AUS: पाचव्या टी-२० सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? एम. चिन्नास्वामी स्टेडियमची काय आहे आकडेवारी, जाणून घ्या

चाहत्यांनी नवीनला दिले होते प्रोत्साहन –

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, जेव्हा नवीनने इंग्लंडच्या जोस बटलरला बाद केले, तेव्हा चाहत्यांनी त्याला खूप प्रोत्साहन दिले होते. या सामन्यात अफगाणिस्तानने गतविजेत्या संघाविरुद्ध शानदार विजय नोंदवला होता. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून विश्वचषक २०२३ मधील पहिला सामना जिंकला.

Story img Loader