Virat-Sachin 29th Century coincidence: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीने २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात यजमान संघ वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी कोहलीने आता आपल्या शतकाच्या जोरावर क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे विराट कोहली क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. यासोबतच त्याने आपला ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना संस्मरणीय बनवला आहे. कारण त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत आपले ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे.आता रन मशिन कोहलीने आपला फॉर्म यापुढेही कायम राखावा आणि अशीच फलंदाजी करत राहावी अशी अपेक्षा प्रत्येकाला असेल.

विराटच्या ५०० व्या सामन्यात त्याने शतक झळकावले. त्याचे हे २९वे शतक आहे. सचिन तेंडुलकरने झळकावलेल्या २९व्या शतकाबाबत अनोखा योगायोग जुळून आला आहे. सचिन तेंडुलकरने २००२ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये २९ वे कसोटी शतक झळकावले होते. विराट कोहलीने २०२३ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये २९ वे कसोटी शतक झळकावले.

५५ महिन्यांनी परदेशी भूमीवर ठोकले कसोटी शतक

विराटने ५५ महिन्यांनंतर अर्थात तब्बल १६७७ दिवसांनी परदेशी भूमीवर कसोटीत शतक ठोकले आहे. परदेशी भूमीवर शेवटचे शतक विराटने डिसेंबर २०१८ मध्ये पर्थ स्टेडियमवर झळकावले होते. म्हणजेच तब्बल साडेचार वर्षांनी परदेशी भूमीवर शतक झळकावले. १६ डिसेंबर २०१८ रोजी विराटने पर्थमध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर त्या सामन्यात त्याने १२३ धावांची खेळी केली. आता त्याने परदेशी भूमीवर ३७ डावांनंतर कसोटी शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध कोहलीचे हे तिसरे कसोटी शतक ठरले. याआधी त्याने नॉर्थसाऊंड (२००) आणि राजकोट कसोटीत (१३९) शतके झळकावली होती.

हेही वाचा: IND vs PAK: पुन्हा मौका मौका! बांगलादेशवरील विजयाने अंतिम सामन्यात रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला

कोहली १२१ धावा करून बाद झाला

सुरेख शतक झळकावल्यानंतर कोहली धावबाद झाला आणि भारताने ५वी विकेट गमावली. त्याने २०६ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावांची खेळी केली. वॅरिकनच्या चेंडूवर स्क्वेअर लेगवर खेळून विराटने जडेजाला एक धाव घेण्यासाठी आवाज दिला. अल्झारी जोसेफने नॉन-स्ट्रायकरच्या एंडला थेट थ्रो केला आणि विराट क्रीजपासून फार दूर राहिला. विराटने रवींद्र जडेजासोबत २८६ चेंडूत १५९ धावांची भागीदारी केली. सध्या भारताने ३९३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या आहेत. इशान किशन २५ धावांवर बाद झाला असून अश्विन १८ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After virat kohli century history repeated itself sachin and virat his 29th test got a quiet nice coincidence avw
Show comments