Virat Kohli Eating Photo Viral: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला जात असून दोन दिवस पूर्ण झाले आहेत. या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताने ५ बाद १५१ धावा केल्या आहे. या डावात भारतीय फलंदाजांची दाणादाण उडालेली पाहिला मिळाली. यादरम्यान विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा ३१८ धावांनी मागे आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवरून चाहते विराटला ट्रोल करत आहेत. त्याचबरोबर काही जण मीम्सच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

टीम इंडियाने ३० च्या धावसंख्येवर दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर सर्वांना विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यानुसार कोहलीही अत्यंत सावधपणे फलंदाजी करत होता. पण मिचेल स्टार्कच्या एका चेंडूवर तो स्लिपमध्ये झेलबाद झाला. कोहली ३१ चेंडूत १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर विराट कोहली जेवण करताना दिसला.

हेही वाचा – WTC Final 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

हा फोटो समोर आल्यानंतर चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करताना दिसले. चाहत्यांच्या मते विराट कोहलीला त्याची विकेट गमावण्याचे अजिबात दुःख नाही. या फोटोसह, चाहते सचिन तेंडुलकरच्या विधानाची आठवण करून देत आहेत, जेव्हा सचिन २००३ च्या विश्वचषक फायनलमध्ये लवकर आऊट झाल्यानंतर ३ दिवस जेवला नव्हता. या आशयाचा फोटोही व्हायरल करत आहेत.

भारतीय संघाच्या सर्व आशा अजिंक्य रहाणेवर अवलंबून –

तब्बल १८-१९ महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे पुनरागमन केले आहे. तो दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. विकेटकीपर फलंदाज केएस भरत सध्या त्याच्यासोबत खेळत आहे. आता पहिल्या डावात भारतीय संघाच्या सर्व आशा अजिंक्य रहाणेवर अवलंबून आहेत. रहाणे सध्या ७१ चेंडूत २९ धावा करुन नाबाद आहे. फॉलोऑनचा धोका टाळण्यासाठी भारतीय संघाला अजून ११८ धावा करायच्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After virat kohli got out in the wtc final fans are trolling him after seeing his meal picture vbm