भारताचा कर्णधार विराट कोहलीचे मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय, नॉर्थ साऊंड (अँटिग्वा)

फलंदाजीच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारत गोलंदाजांवर अंकुश ठेवणे उपयुक्त ठरते, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला.

लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरच्या उसळणाऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ जायंबदी झाला. त्यानंतर वेगवान गोलंदाजांचे उसळणारे चेंडू यासंदर्भात क्रिकेटक्षेत्रात चर्चा ऐरणीवर आहे. याबाबत जागतिक कसोटी क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या कोहलीनेसुद्धा आपले मत मांडले.

‘‘गोलंदाजांना वर्चस्व गाजवू देण्याची संधी न देता सुरुवातीलाच फटकेबाजी करून त्यांच्यावर दडपण आणायला मला आवडते,’’ असे कोहलीने सांगितले. आक्रमक फटकेबाजीकरिता कोहलीची वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्सशी तुलना केली जाते. रिचर्ड्स हे आम्हा सर्व फलंदाजांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे, असे कोहलीने सांगितले.

हेल्मेट गैरसोयीचे वाटायचे -रिचर्ड्स

दर्जेदार वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्धी संघांमध्ये असतानाही रिचर्ड्स त्यांच्या काळात हेल्मेट घालणे टाळायचे. यासंदर्भात ते म्हणाले, ‘‘मला ज्ञात असलेल्या खेळात मी समरस होऊन खेळतो आहे, यावर माझा विश्वास होता. हेल्मेट घालून खेळण्याचा मी प्रयत्न केला, परंतु ते माझ्यासाठी गैरसोयीचे ठरत होते. त्यामुळे मी किरमिजी रंगाची टोपी घालणे पसंत करायचो. माझा दृष्टिकोन ठाम होता.’’