मोठय़ा लढाईपूर्वी योद्धे शस्त्र परजून घेतात. प्रतिस्पध्र्याना धूळ चारण्यासाठी शस्त्रे अद्ययावत स्थितीत आणण्यासाठी लढाईपूर्वीचा कालखंड महत्त्वाचा असतो. भारतीय संघ काही दिवसांतच ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यावर जाणार आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आपले शस्त्र अर्थात बॅट सर्वोत्तम असावी यासाठी तब्बल पाच तास खर्ची घातले आहेत.  दर्जेदार बॅट्सच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध मेरठला भेट देत धोनीने १२६० ग्रॅमच्या सहा बॅट खरेदी केल्याचे सूत्रांनी सांगितले. बॅटच्या आकाराइतकाच लाकडाच्या प्रतीबाबतही धोनी जागरूक असल्याचे धोनीने भेट दिलेल्या कंपनीतील कामगारांनी सांगितले.

Story img Loader