Deepak Chahar Back From Injury: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ चा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी चांगली बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मध्यमगती गोलंदाज दीपक चहरला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. गेल्या ६ महिन्यांपासून दीपक चहर दोनदा त्याच्या फिटनेसच्या समस्येशी लढताना दिसला होता. पण आता तो आगामी आयपीएल हंगामासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

दीपक चहर पूर्वी स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्येशी झुंज देत होता, त्यानंतर त्याला क्वाड ग्रेड ३ टियरचा सामना करावा लागला. दीपकने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी बांगलादेश दौऱ्यावर खेळलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खेळला होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहरला फक्त ३ षटके टाकता आली होती.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Champions Trophy Tour Updates PoK cities removed from ICC global Trophy Tour
Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

२०२२ मध्ये दीपक चहर भारतीय संघासाठी केवळ १५ सामने खेळू शकला. त्याचवेळी, टी-२० विश्वचषकापूर्वी तो अनफिट असल्यामुळे संघाचा भाग होऊ शकला नाही. यानंतर एक महिन्यानंतर तो संघात परतला पण पुन्हा अनफिट असल्यामुळे त्याला वगळण्यात आले. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिहॅबमध्ये बराच काळ घालवल्यानंतर, चहर आयपीएलच्या आगामी हंगामात भाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा – Dinesh Karthik: ‘…म्हणून टॉयलेटमध्ये गेल्यावर रडू लागलो’; केएल राहुलच्या खराब फॉर्मवर दिनेश कार्तिकचे मोठं वक्तव्य

गेल्या २ महिन्यांपासून फिटनेसवर खूप काम केले –

दीपक चहरने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गेल्या २ ते ३ महिन्यांत मी माझ्या फिटनेसवर खूप काम केले आहे. आता मी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मला २ मोठ्या दुखापती झाल्या ज्यात एक स्ट्रेस फ्रॅक्चर आणि दुसरी क्वाड ग्रेड ३ टियर होती. या दोन्ही दुखापतींमुळे तुम्ही अनेक महिने बाहेर राहता.”

हेही वाचा – Harbhajan Singh Tweet: केएल राहुलविरोधात बोलणाऱ्यांची हरभजन सिंगने केली बोलती बंद; म्हणाला, ‘तो तुमचाच…’

चहर पुढे म्हणाला की, “कोणत्याही खेळाडूला या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागतो, विशेषत: वेगवान गोलंदाजाला. जर मी फलंदाज असतो, तर मी खूप आधी खेळायला सुरुवात केली असती, पण वेगवान गोलंदाजासाठी स्ट्रेस फ्रॅक्चरनंतर परत येणं आणि ट्रॅकवर येणं सोपं काम नाही. तुम्हाला यामध्ये इतर गोलंदाज दिसतील जे या समस्येशी झगडले आहेत.”