Dinesh Karthik appointed as RCB’s mentor and batting coach : भारताचा माजी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये कॉमेंट्री करणाऱ्या दिनेश कार्तिकला टूर्नामेंट संपल्यानंतर मोठी ऑफर मिळाली आहे. दिनेश कार्तिकची आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली. आयपीएल २०२४ संपल्यानंतर दिनेश कार्तिकने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकने २०२४ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करताना दिसला.

दिनेश कार्तिकला मिळाली मोठी जबाबदारी –

आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिनेश कार्तिकची मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे. दिनेश कार्तिक आता पुन्हा एकदा विराट कोहलीसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणार आहे. मात्र, यावेळी दिनेश कार्तिकची भूमिका वेगळी असणार आहे. दिनेश कार्तिक क्रिकेटच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळू शकणार नसला तरी ड्रेसिंग रुममध्ये तो या संघासाठी विजयी रणनीती नक्कीच बनवेल. आयपीएल २०२४ च्या मोसमात, दिनेश कार्तिकने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून १५ सामन्यात ३६.२२ च्या सरासरीने ३२६ धावा केल्या. या काळात दिनेश कार्तिकने २ अर्धशतके झळकावली होती.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

दिनेश कार्तिकची आयपीएल कारकीर्द –

दिनेश कार्तिकने आयपीएल २०२४ च्या मोसमात विकेटच्या मागे ५ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएल २०२४ च्या मोसमात दिनेश कार्तिकने विकेट्स राखताना ४ झेल घेतले आणि १ स्टंपिंग केले. आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर दिनेश कार्तिकने अचानक आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दिनेश कार्तिकने २५७ आयपीएल सामन्यात २६.३२ च्या सरासरीने ४८४२ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – “…टी-२० कारकीर्दीला पूर्णविराम देण्यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकतं’; विराट-रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य

दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये २२ अर्धशतके झळकावली आहेत. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये विकेटकीपिंग करताना १४७ झेल घेतले आहेत आणि ३७ वेळा स्टंपिंग केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकचे रेकॉर्डही चांगले आहेत. भारतासाठी दिनेश कार्तिकने २६ कसोटी सामन्यांमध्ये १०२५ धावा, ९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १७५२ धावा आणि ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६८६ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकने कसोटी सामन्यात ६३ विकेट्स, एकदिवसीय सामन्यात ७१ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३६ विकेट्स घेतल्या आहेत.

Story img Loader