Jasprit Bumrah ready to face against Pakistan Match: आशिया कप २०२३ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी पुन्हा एकदा मंच तयार झाला आहे. १० सप्टेंबरला दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. हा सामना कोलंबोमध्ये होणार आहे, परंतु आतापर्यंत पावसाची शक्यता आहे. पाऊस पडेल की नाही हा वेगळा विषय, पण तयारी शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया आणखी मजबूत झाली आहे. आशिया चषकाच्या मध्यंतरातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा श्रीलंकेत पोहोचला असून आपल्या संघात सामील झाला आहे.

जसप्रीत बुमराहचे श्रीलंकेत पुनरागमन, पाकिस्तानविरुद्ध खेळणार –

जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करून पुन्हा भारतीय संघात प्रवेश केला आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सुपर 4 सामन्यासाठी तो शुक्रवारी सकाळी कोलंबोला पोहोचला. जसप्रीत बुमराह २ सप्टेंबर रोजी भारतीय संघाच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर भारतात परतला होता. यामुळेच तो ४ सप्टेंबरला नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. आज संध्याकाळी जसप्रीत बुमराह आर प्रेमदासा स्टेडियमवर सराव सत्रासाठी त्याच्या संघात सामील होईल आणि तयारीला अंतिम रूप देईल. कोलंबोमध्ये पावसाची चर्चा असली तरी त्यामुळे इनडोअर स्टेडियममध्ये सराव सुरू आहे.

हेही वाचा – VIDEO: क्रिकेटनंतर एमएस धोनीने ‘या’ खेळात आजमावला हात, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत खेळला सामना

जसप्रीत बुमराहने जवळपास वर्षभरात एकदिवसीय सामन्यात केलेली नाही गोलंदाजी –

जसप्रीत बुमराह जवळपास वर्षभरानंतर टीम इंडियात परतला आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली, ज्यामध्ये तो कर्णधारही होता. मात्र त्याने अद्याप वनडेत गोलंदाजी केलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होता, पण पावसामुळे भारतीय संघ तिथे गोलंदाजी करू शकला नाही. यानंतर तो नेपाळच्या सामन्यात खेळताना दिसला नाही. आता पाकिस्तानविरुद्ध दीर्घ कालावधीनंतर प्रथमच तो गोलंदाजीने आपली ताकद दाखवणार आहे. पण आता प्रश्न आहे की जसप्रीत बुमराह पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये दाखल झाला तर कोणाला वगळले जाईल.

हेही वाचा – US Open 2023: रोहन बोपण्णाचा विश्वविक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू, विजेतेपदापासून एक पाऊल दूर

मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर या दोघांपैकी एकाला बाहेर जावे लागेल –

पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यानंतर नेपाळविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचा भारतीय संघात प्रवेश करण्यात आला. त्या सामन्यात शमीने सात षटकांत २९ धावा देत एक विकेट घेतली होती. तर मोहम्मद सिराजने ९.३ षटकात ६१ धावा देत तीन बळी घेतले. शार्दुल ठाकूरने चार षटकांत २६ धावा दिल्या आणि एक बळी घेतला. अशा परिस्थितीत मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी कोणाला तरी बाहेर जावे लागेल, जेणेकरून जसप्रीत बुमराहला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकेल. मात्र, कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक झाल्यावरच याचा खुलासा करेल.

Story img Loader