Aiden Markram reacts to defeat : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार एडन मार्करमने भारताविरुद्ध जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात संघाच्या पराभवाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या पराभवासाठी एडन मार्करामने खराब फलंदाजीला जबाबदार धरले आहे. २०१ धावांचा पाठलाग करताना आपल्या संघाला कोणतीही अडचण नव्हती, परंतु त्यानुसार फलंदाजी करता आली नाही, असे त्याने सांगितले.

टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून २०१ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालने ४१ चेंडूत ६० तर सूर्यकुमार यादवने ५६ चेंडूत १०० धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघ १३.५ षटकांत केवळ ९५ धावांवरच मर्यादित राहिला. कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत अवघ्या १७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. यासह मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

हे लक्ष्य गाठता आले असते – एडन मार्करम

दक्षिण आफ्रिकेचा संघ सुरुवातीला चांगला खेळला पण खालच्या फळीतील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. संघाच्या या पराभवाबाबत एडन मार्करमने मोठे वक्तव्य केले आहे. सामन्यानंतर तो म्हणाला, “२०० धावांचा पाठलाग करावा लागल्याबद्दल मला कोणतीही खंत नव्हती. मला वाटले होते की आम्ही हे लक्ष्य गाठू शकू आणि हे असे लक्ष्य होते, जे पार केले जाऊ शकले असते. आम्ही क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाज कुठेही फटकेबाजी करू शकतात, असे वाटत होते. मात्र, या सामन्यातून आमच्यासाठी काही सकारात्मक गोष्टी घडल्या. काही गोष्टी आमच्यासाठी चांगल्या होत्या आणि काही गोष्टींवर आम्हाला काम करण्याची गरज आहे.”

हेही वाचा – SLC Board : सनथ जयसूर्याचे श्रीलंका क्रिकेटमध्ये पुनरागमन, ‘या’ पदावर राहून पाहणार संघाचे कामकाज

सूर्यकुमारने रोहित-मॅक्सवेलची केली बरोबरी –

सूर्यकुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलची बरोबरी केली. तिन्ही फलंदाजांची प्रत्येकी चार शतके आहेत. सूर्यकुमारने ५६ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह १०० धावा केल्या. सूर्यकुमारशिवाय यशस्वी जयवालने (६०) तिसरे अर्धशतक झळकावले. यशस्वी आणि सूर्यकुमार यांनी तिसऱ्या विकेटसाठी 70 चेंडूत ११२ धावांची शतकी भागीदारी केली.