आक्रमक एअर इंडियाने यजमान राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स(आरसीएफ)चा ४०-१९ असा सहज पराभव करून सुफला चषक अखिल भारतीय कबड्डी स्पध्रेत चमकदार प्रारंभ केला. भारतीय नौदलाने रायगडचा ३७-१० असा पराभव केला. देना बँकेने बँक ऑफ इंडियावर ८-७ अशी मात केली.
एअर इंडियाने दणक्यात सुरुवात करताना मध्यंतराला २१-८ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्या गौरव शेट्टीची पकड झाली, पण अजय ठाकूर आणि नितीन कुंभार यांनी गुण घेण्याचा सपाटा लावला. दीपक झझोट उत्तमरीत्या बचावात कामगिरी करीत राहिल्याने एअर इंडियाला हा विजय साकारता आला. आता यजमान आरसीएफने गुरुकुल (चिपळूण) आणि जम्मू-काश्मीर यांना हरविल्यास ते बाद फेरीत पोहाचू शकतील.
दरम्यान, उज्ज्वला चषक या महिलांच्या स्पध्रेत तामिळनाडूच्या संघाने मुंबईच्या डॉ. शिरोडकर क्लबचा २१-१८ असा सहज पराभव केला.
एअर इंडिया, नौदलाची विजयी सलामी
आक्रमक एअर इंडियाने यजमान राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स(आरसीएफ)चा ४०-१९ असा सहज पराभव करून सुफला चषक अखिल भारतीय कबड्डी स्पध्रेत चमकदार प्रारंभ केला.
First published on: 09-11-2012 at 05:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india navy started with won