Air show Parade of Champions and more Everything to watch out for in fourpart closing ceremony : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय विश्वचषका २०२३चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून हा सामना संस्मरणीय बनवण्यासाठी बीसीसीआयनेही तयारी केली आहे. बीसीसीआयने शनिवारी (१८ नोव्हेंबर) सामन्याच्या एक दिवस आधी फायनलच्या दिवशी कोण-कोणते कार्यक्रम होणार हे सांगितले. मंडळाने सर्व कार्यक्रमांची यादी आणि वेळापत्रकही जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयच्या माहितीनुसार, सामन्यापूर्वी भारतीय वायुसेनेचा एरोबॅटिक संघ सूर्य किरणचा एअर शो करेल. तसेच नाणेफेक झाल्यानंतर लगेचच दुपारी १:३५ वाजता कार्यक्रम सुरू होईल. एअर शो १५ मिनिटे चालेल आणि दुपारी १:५० वाजता संपेल. यानंतर दोन्ही संघांचे राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सामना सुरू होईल.

ड्रिंक्स आणि इनिंग ब्रेक्स दरम्यान होणार कार्यक्रम –

सामन्यादरम्यान पहिल्या डावात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान गायक आदित्य गढवी परफॉर्म करणार आहे. यानंतर सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्याशिवाय प्रसिद्ध गायिका जोनिता गांधी, नकाश अजीज, अमित मिश्रा, आकाश सिंग आणि तुषार जोशी हे देखील परफॉर्म करणार आहेत. यानंतर दुसऱ्या डावात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान लेझर आणि लाइट शो आयोजित केला जाईल.

सायंकाळी ५:३० वाजता चॅम्पियन्सची होणार परेड –

सर्व विश्वचषक विजेत्या संघांच्या कर्णधारांना २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तानचा इम्रान खान वगळता, वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉयडपासून इंग्लंडच्या इऑन मॉर्गनपर्यंतचा प्रत्येक कर्णधार अंतिम सामन्याच्या इनिंग ब्रेक दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन्सच्या परेडमध्ये भाग घेईल. या कार्यक्रमादरम्यान, कर्णधार त्यांच्या विश्वचषक विजेत्या ट्रॉफीचे प्रदर्शन करतील आणि बीसीसीआयकडून त्यांचा सत्कारही केला जाईल.

हेही वाचा – IND vs AUS Final: माजी दिग्गजाने सांगितली ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी कमतरता, टीम इंडिया फायनलमध्ये फायदा उचलणार का?

विश्वविजेत्या कर्णधारांना मिळणार खास ब्लेझर –

बीसीसीआय १९७५ ते २०१९ मधील सर्व विश्वचषक विजेत्या कर्णधारांना एक विशेष ब्लेझर देखील देणार आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्लाइव्ह लॉईड (१९७५ आणि १९७९), भारताचे कपिल देव (१९८३), ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर (१९८७), श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा (१९९६), ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ (१९९९), रिकी पॉन्टिंग (२००३ आणि २००७), भारताचा महेंद्र धोनी (२०११), ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क (२०१५), इंग्लंडचा इऑन मॉर्गन (२०१९) या सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा – Mohammed Shami: योगी सरकारने घेतला मोठा निर्णय! मोहम्मद शमीच्या गावात बांधले जाणार स्टेडियम

चॅम्पियन्सचा मुकुट –

यावेळी विश्वचषक विजेत्यांसाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा अनोखा मार्ग असेल. विश्वचषक विजेत्या संघाचे नाव आणि ट्रॉफीसह लेझर जादू केली जाईल. या दरम्यान, १२०० हून अधिक लोक २०२३ च्या विश्वचषक विजेत्यांच्या नावाने अहमदाबादचे आकाश उजळतील आणि त्यानंतर काही मोठ्या फटाक्यांची आतषबाजी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या भव्य सोहळ्याची सांगता होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air show parade of champions and more everything to watch out for in fourpart closing ceremony in world cup 2023 final vbm
Show comments