Aishwarya Pratap Singh Silver in 50m Rifle 3 Positions: भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंगने आणखी एक पदक आपल्या नावावर केले आहे. त्याने शुक्रवारी सांघिक स्पर्धा जिंकल्यानंतर वैयक्तिक पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्सच्या अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकले. ऐश्वर्यने ४५९.७ गुण मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनच्या लिन्सूने विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. त्याला ४६०.६ गुण मिळाले. भारताचा स्वप्नील सुरेश बराच काळ पहिल्या स्थानावर राहिला, मात्र शेवटच्या क्षणांमध्ये तो मागे पडला. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्वप्नीलला ४३८.९ गुण मिळाले आहेत.
स्क्वॉश संघाला कांस्यपदकावर मानावे लागले समाधान –
भारतीय महिला स्क्वॉश संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत त्याला हाँगकाँगविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. अनहत सिंगला गेल्या सामन्यात ली विरुद्ध १०-१२ असा पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी तन्वी खन्ना हरली होती. जोश्ना चिनप्पाने दुसरा सामना जिंकून भारताला बरोबरीत आणले होते, पण अनाहतच्या पराभवाने संघाला अंतिम फेरी गाठू दिली नाही.
? BRONZE GLORY in Squash! ???
— SAI Media (@Media_SAI) September 29, 2023
Our Women's Squash Team of @Anahat_Singh13, @joshnachinappa, Tanvi, and @DipikaPallikal has displayed incredible resilience and skill at the #AsianGames2022, securing the BRONZE MEDAL! ??
Great effort, champs! ?#Cheer4India#JeetegaBharat… pic.twitter.com/DMKdcOn9lK
त्तत्पूर्वी गुरुवारी भारताला नेमबाजीत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाले आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय महिला संघाने रौप्यपदक जिंकले, जे सहाव्या दिवशी भारताचे पहिले पदक होते. यानंतर, पुरुष संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि ५० मीटर 3P मध्ये सुवर्णपदक जिंकले. नेमबाजीत भारताकडून उत्तम कामगिरी सुरूच आहे.
हेही वाचा – World Cup 2023: आजपासून रंगणार सराव सामन्यांचा थरार! जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार सामने?
स्वप्नील कुसाळे, ऐश्वर्य प्रताप सिंग, अखिल शेओरन यांच्या पुरुष संघाने ५० मीटर रायफल ३पी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. ईशा, दिव्या आणि पलक या महिला सांघिक त्रिकुटाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात देशासाठी रौप्यपदक जिंकले. भारताने आतापर्यंत नेमबाजीत एकूण १५ पदके जिंकली आहेत. सुवर्ण जिंकण्यासोबतच पुरुष संघाने विश्वविक्रमही केला. भारतीय संघाने १७६९ गुण मिळवले. त्याचबरोबर चीनने १७६३ गुण मिळवून रौप्यपदक जिंकले. याशिवाय दक्षिण कोरियाने १७४८ गुणांसह तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. तसेच पलकने वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. वैयक्तिकरित्या, ईशा सिंगने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्येही रौप्यपदक जिंकले.
सहाव्या दिवशी आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी जिंकलेली पदकं –
नेमबाजी – १० मीटर पिस्टल महिला संघ – रौप्यपदक
नेमबाजी – ५० मीटर 3P राइफल पुरुष संघ – सुवर्णपदक
नेमबाजी – १० मीटर पिस्टल वैयक्तिक(पलक गुलिया) – सुवर्णपदक
नेमबाजी – १० मीटर पिस्टल वैयक्तिक(इशा सिंग) – रौप्यपदक
नेमबाजी – ५० मीटर 3P राइफल वैयक्तिक(ऐश्वर्य प्रताप सिंग) रौप्यपदक
टेनिस – पुरुष डबल्स (रामकुमार रामनाथन और साकेत) – रौप्यपदक
स्क्वॉश – भारतीय महिला संघ- कांस्यपदक
?SILVER FOR AISHWARY ?
??'s Aishwary Pratap Tomar clinched a silver at #AsianGames2022 in the Men's 50m Rifle 3P Individual! ??
With this Aishwary has won a total of 4️⃣ medals so far (2 ?, 1 ?, and 1 ?). And this is ??'s 18th medal overall in shooting?⚡
Aishwary,… pic.twitter.com/cXLnLf9ZPx— SAI Media (@Media_SAI) September 29, 2023