Champions Trophy Ajay Jadeja Trolled on Social media: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला नमवत आपलं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. तर यजमान पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला आहे. भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाचे एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पाकिस्तानचे दिग्गज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांच्याससह सामन्याचे विश्लेषण करत होता. त्याचवेळी त्यांच्या त्यांनी केलेल्या विधानाने सध्या चर्चेला उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने भारतीय संघ दुबईत खेळत आहे. तर इतर सर्व संघ पाकिस्तानात आपले सामने खेळत आहेत. यादरम्यान भारत-पाकिस्तान यांचा सामना दुबईत खेळवण्यत आला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टीच्या परिस्थितीचे विश्लेषण करताना अजय जडेजाने खेळपट्ट्यांची तुलना पत्नींशी केली. त्यांचे हे वक्तव्य ऐकून अक्रम आणि युनूससह भारताचा माजी क्रिकेटपटू निखिल चोप्राही हसला.

हे विधान व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि लोकांनी त्याची तुलना कॉमेडियन समय रैनाच्या यूट्यूब शो इंडियाज गॉट लेटेंटशी करण्यास सुरुवात केली. अगदी एका युजरने म्हटलं की, “बोलण्याआधी थोडा विचार करायला हवा होता.”

अजय जडेजा नेमकं काय म्हणाला?

अजय जडेजा खेळपट्टीबद्दल बोलताना अक्रम आणि वकारकडे बघितलं आणि म्हणाला, “इथे तर सगळेच विवाहित आहेत. खेळपट्टीचा अहवाल पण अगदी असाच आहे. आपण बघतो एक पण जेव्हा खेळायला सुरूवात करतो तेव्हा खरं कळतं. जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टीही बदलते.” तिथे बसलेल्या एकाने उत्तर दिलं, “ही उपमा अगदी स्पॉट ऑन आहे.” जडेजा नंतर म्हणाला, “यातून काय कळतं. खेळपट्टी कशीही असली तरी त्याच खेळपट्टीसोबत राहायचं आहे.”

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ ४९.४ षटकांत २४१ धावांत गारद झाला. त्यासाठी सौद शकीलने ६२ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने ३ आणि हार्दिक पंड्याने २ विकेट घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजाची चांगलीच शाळा घेतली.

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने टीम इंडियासाठी नाबाद शतक केले. श्रेयस अय्यरने ५६ धावांची अर्धशतकी खेळी आणि शुबमन गिलने ४६ धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माने २० धावा केल्या. हार्दिक पंड्याने ८ धावा केल्या तर अक्षर पटेलने ३ धावा केल्यानंतर नाबाद राहिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने २ विकेट घेतले.