भारताविरुद्धच्या कसोटीत एका डावात १० विकेट्स घेऊन इतिहास रचणाऱ्या एजाज पटेलला न्यूझीलंड कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने बुधवारी आपला संघ जाहीर केला. आश्चर्याची बाब म्हणजे यात एजाज पटेलचे नाव नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज हा तोच गोलंदाज आहे, ज्याने मुंबई कसोटीत भारताविरुद्ध एका डावात १० बळी घेतले होते. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट इतिहासातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे.

१ जानेवारी २०२२ पासून न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघात १७ खेळाडूंचा समावेश केला आहे. टॉम लॅथम पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळणार आहे. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विल्यमसन दुखापतग्रस्त झाला आहे.

हेही वाचा – VIDEO : अजबच..! बोलण्यासाठी तोंड उघडताच विराटला बसला ‘धक्का’; अचानक घडलं ‘असं’ काही…

डेव्हॉन कॉन्वे न्यूझीलंडच्या कसोटी संघात परतला आहे. संघातील सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे एजाज पटेलची हकालपट्टी. भारतीय वंशाचा रचिन रवींद्र हा संघातील एकमेव फिरकी गोलंदाज आहे. टिाम साऊदीला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. टॉम ब्लंडेलला संघात यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे.

न्यूझीलंड संघ

टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, ​​डेव्हॉन कॉन्वे, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, नील वॅगनर.

Story img Loader