Ajaz Patel has become the foreign bowler who has taken the most wickets at the Wankhede : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फिरकी गोलंदाज एजाज पटेलने अप्रतिम कामगिरी केली आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ज्याचा एजाज पटेलने चांगला फायदा घेतला. या सामन्यातील त्याच्या शानदार गोलंदाजीनंतर तो विशेष यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात एजाज पटेलने २१.४ षटकात १०३ धावा देत ५ विकेट्स घेतले. त्याचबरोबर सामन्याच्या दुसऱ्या डावात ४ विके्स घेत त्याने इयान बोथमचा खास विक्रम मोडीत काढला.
एजाज पटेल भारतात ठरला नंबर वन गोलंदाज –
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात एजाज पटेलने चौथी विकेट घेताच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावावर २३ विकेट्सची नोंद झाली आणि मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारतातील कोणत्याही एका ठिकाणी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या विदेशी गोलंदाजांच्या यादीत एजाज पटेल पहिला क्रमांकावर पोहोचला आहे. यासह त्याने इयान बोथमचा विक्रम मोडला आहे. इयान बोथमने वानखेडे स्टेडियमवर २२ कसोटी विकेट घेतल्या होत्या. या यादीत अनेक दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे.
भारतीय मैदानावर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे विदेशी गोलंदाज :
२३ – एजाज पटेल, मुंबई (वानखेडे)
२२ – इयान बोथम, मुंबई (वानखेडे)
१८ – रिची बेनॉड, ईडन गार्डन्स
१७ – कोर्टनी वॉल्श, मुंबई (वानखेडे)
१६ – रिची बेनॉड, नेहरू स्टेडियम, चेन्नई
१६- नॅथन लायन, दिल्ली
ह
मुंबईत एजाज पटेलचा राहिला दबदबा –
एजाज पटेलने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नेहमीच चमकदार गोलंदाजी केली आहे. वानखेडे स्टेडियमवरील हा त्याचा दुसरा सामना आहे. याआधीच्या सामन्यात त्याने दोन्ही डावात एकहाती १४ विकेट्स घेतल्या होत्या. ज्यात त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या. त्या सामन्याच्या पहिल्या डावात अजाज पटेलनेही शानदार गोलंदाजी करत १०६ धावांत ४ विकेट्स घेतले. एजाज पटेलने आज वाखेडेवर स्टेडियमवर भारताविरुद्ध दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या.