Ajinkya Rahane scored a century for Leicestershire in County Championship : अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र शतक झळकावून त्याने पुन्हा एकदा भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. रहाणेने काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू २०२४ च्या सामन्यात लीसेस्टरसाठी शतक झळकावले. त्याने शतकी खेळी करत लीसेस्टरशायर संघाला ३०० धावांचा पल्ला गाठून देत मजबूत स्थितीत पोहोचवले. रहाणेने भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी शतक झळकावल्याने त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाच्या आशा वाढल्या आहेत.

अजिंक्य रहाणे टीम इंडियातील पुनरागमनाचे दिले संकेत –

अजिंक्य रहाणेने टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना जुलै २०२३ मध्ये खेळला होता. या सामन्यानंतर तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करु शकला नाही. आता भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी रहाणेने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले, तर त्याला लवकरच टीम इंडियात संधी दिली जाऊ शकते.

IND vs BAN Team India squad announced for 1st match against bangladesh
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
BCCI Announces Ajay Ratra as Replacement of Salil Ankola as member of India selection committee
बांगलादेशविरूद्धच्या मालिकेपूर्वी BCCIकडून मोठे फेरबदल, निवड समितीविषयी घेतला महत्त्वाचा निर्णय
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Former NCP corporator Vanraj Andekar,
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

अजिंक्यने रहाणेने लीसेस्टरशायरसाठी झळकावले शतक –

वास्तविक, काउंटी चॅम्पियनशिपमध्ये कार्डिफमध्ये लीसेस्टरशायर आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान लिसेस्टरशायरच्या दुसऱ्या डावात रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने १९२ चेंडूत १०२ धावा केल्या. रहाणेने या खेळीत १३ चौकार आणि एक षटकारही लगावला. या शतकानंतर तो सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला.

हेही वाचा – MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल

अजिंक्य रहाणेबाबत अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये तो लवकर भारतीय कसोटी संघात स्थान मिळवेल, असे बोलले जात आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रहाणेने ८५ कसोटी सामन्यात ५०७७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने १२ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली आहेत. रहाणेची कसोटी सर्वोत्तम धावसंख्या १८८ धावा