भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मैदानावर नेहमी शांत असणाऱ्या अजिंक्य रहाणेने आपलं सामाजिक भान पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची असलेली बिकट अवस्था ही सर्वांना माहिती आहे. अशावेळी शेतकरी करत असलेल्या मेहनतीची जाण प्रत्येकाने ठेवावी यासाठी अजिंक्यने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आपण स्वतः शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे, शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी मला जाण आहे. शेतकऱ्यांच्या रोजच्या मेहनतीमुळे आपण रोज जेवणाचे चार घास सुखाने जेवतो असं म्हणत अजिंक्यने शेतकऱ्याचे आभार मानले आहेत.

अजिंक्य रहाणे सध्या भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य भाग आहे. मात्र वन-डे आणि टी-२० संघात त्याचं स्थान अजुनही निश्चीत झालेलं नाहीये. नुकतच अजिंक्यला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र या स्पर्धेत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

Story img Loader