Ajinkya Rahane CSK vs KKR : इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामातला ३३ वा सामना ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी केकेआरच्या गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला. सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड ३५ धावा करून बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने केकेआरच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं.

मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडणाऱ्या रहाणेनं आज ईडन गार्डन्सवरही वादळी अर्धशतक ठोकलं. रहाणेने अवघ्या २९ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी साकारल्याने चेन्नईला केकेआरविरुद्ध दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. अजिंक्यच्या खेळीला ५ षटकार आणि ६ चौकार साज लाभला. रहाणेव्यतिरिक्त सलामीवर डिव्हॉन कॉनवे आणि शिवम दुबेच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने २० षटकात ४ गड्यांच्या बदल्यात २३४ धावांपर्यंत मजल मारली.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

बरेच जण अजिंक्यला कसोटी क्रिकेटपटू समजतात. परंतु आज अजिंक्यने ज्या वेगाने धावा जमवल्या ते पाहून अनेकांची बोलती बंद झाली. इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार केविन पीटरसनदेखील अजिंक्यच्या आजच्या खेळीच्या प्रेमात पडला आहे. त्यातही अजिंक्यच्या एका फटक्याचं पीटरसनने विशेष कौतुक केलं.

१८ व्या षटकातील कुलवंत खेजरोलियाचा शेवटचा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर होता, परंतु अजिंक्यने त्याच्या बॅटची ग्रिप बदलली आणि रिव्हर्स स्कूप शॉट लगावत चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला टोलवला. या चेंडूवर त्याने चौकार वसूल केला.

हे ही वाचा >> IPL 2023 RR vs RCB: ‘… म्हणून या हंगामात खूप अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत’; विजयानंतर विराट कोहलीचा खुलासा

पीटरसनकडून कौतुक

अजिंक्यच्या या शॉटचं केवीन पीटरसननेही कौतुक केलं. पीटरसनने एक ट्वीट केलं आहे, त्यात त्याने म्हटलं आहे की, मी जितके महान (ग्रेट) शॉट्स पाहिले आहेत, हा त्यापैकी एक होता.