Who will captain the Indian Test team after Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ च्या फायनलमधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल बरीच चर्चा आहे. रोहित शर्माला कसोटी कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होत आहे. मात्र, सध्या तरी रोहित शर्मा भारतीय कसोटी संघाचा कर्णधारपद सांभाळणार असल्याचे भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्माचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत तो सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्माच्या फिटनेसमुळे त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅट खेळण्यासाठी योग्य नाही, असे अनेक चाहत्यांना वाटते. ३६ वर्षीय रोहितला पुढील कसोटी चॅम्पियनशिप फायनलपर्यंत तिन्ही फॉरमॅट खेळता येईल की नाही हे स्वतः ठरवावे लागेल. त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे असेल तर त्याला बॅटनेही सातत्य ठेवावे लागेल. रोहित शर्माने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यास भारताच्या नव्या कर्णधाराची निवड सोपी होणार नाही.

पुजारा, कोहली आणि रहाणेचे वय अडचणीचे ठरले –

टीम इंडियातील बहुतांश खेळाडू ३० ते ३५ वयोगटातील आहेत. विराट कोहली हा भारताचा माजी कर्णधार असून त्याला आता पुन्हा कर्णधारपदाचा पर्याय नाही. चेतेश्वर पुजाराला कर्णधारपदाचा अनुभव नाही आणि त्याच्या खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियातूनही बाहेर जाऊ शकतो. अशा स्थितीत अजिंक्य रहाणेला भारताचा नवा कर्णधार बनवले जाऊ शकते. ३५ वर्षीय रहाणेदेखील भारताचे कर्णधार जास्त काळ राहू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना तयार करता येईल.

हेही वाचा – IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी हरभजन सिंगने निवडला संघ, ‘या’ युवा खेळाडूंना दिली संधी

पंत आणि अय्यर यांना मिळू शकते जबाबदारी –

भारतीय संघ व्यवस्थापनाकडे सध्या दोन पर्याय आहेत. जर रोहित शर्मा कर्णधारपदाच्या जबाबदारीसाठी तयार असेल, तर जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंना भावी कर्णधार म्हणून तयार करावे लागेल. तसेच पुढील डब्ल्यूटीसी फायनलनंतर सर्वोत्तम पर्यायाला कर्णधारपद द्यावे. बुमराह व्यतिरिक्त पंत आणि अय्यर यांनी आपल्यात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे, परंतु हे तिन्ही खेळाडू सध्या दुखापतींशी झुंज देत आहेत.

बुमराहची दुखापत अशी आहे की त्याच्यासाठी दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळणे कठीण होईल. त्याचबरोबर पंत कधी मैदानात परतणार याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. अय्यर दुखापतीतून लवकरच पुनरागमन करत आहे, पण रहाणेच्या पुनरागमनानंतर कसोटी संघातील त्याचे स्थान निश्चित झालेले नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाने शुबमन गिलकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा –Virat Kohli: डब्ल्यूटीसीच्या दुःखातून विराट कोहली सावरु शकला नाही? दुसरी इन्स्टा स्टोरी केली शेअर

शुबमन गिल एक उत्त्म पर्याय –

रोहित कर्णधारपद सोडताना रहाणेने ही जबाबदारी घेतली नाही, तर अश्विनलाही कसोटी संघाचा कर्णधार बनवून तो देशाचा भावी कर्णधार तयार करू शकतो. शुबमन गिल तरुण असून भविष्यात त्याला कर्णधारपद मिळाल्यास तो ही जबाबदारी दीर्घकाळ सांभाळू शकेल. त्याचबरोबर लोकेश राहुल आणि जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंना कर्णधार बनवल्यानंतर येत्या दोन-तीन वर्षांनी देशाला पुन्हा नवा कर्णधार पाहावा लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkya rahane shreyas iyer rishabh pant and shubman gill contenders for test captaincy after rohit sharma vbm
Show comments