नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवणार आहे. तो लिस्टरशायर संघाचे प्रतिनिधित्व करेल.रहाणेने काही दिवसांपूर्वीच भारताच्या कसोटी संघात यशस्वी पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत भारताला पराभव पत्करावा लागला; पण रहाणेने आपल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित केले. त्याने या सामन्यातील दोन डावांत अनुक्रमे ८९ आणि ४६ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रहाणेने या वर्षी जानेवारीमध्ये लिस्टरशायर संघासोबत करार केला होता. त्यानुसार तो इंडियन ‘आयपीएल’ संपल्यानंतर आठ प्रथम श्रेणी सामने व रॉयल लंडन करंडक एकदिवसीय स्पर्धेतील सर्व सामने खेळणार होता. मात्र, त्याची भारतीय संघात निवड झाल्याने त्याला ‘आयपीएल’नंतर लिस्टरशायरकडून खेळता आले नाही; परंतु विंडीज दौऱ्यानंतर तो कौंटी क्रिकेट खेळणार आहे. विंडीज दौऱ्यातील दोन कसोटी सामने अनुक्रमे डॉमिनिका (१२ ते १६ जुलै) आणि त्रिनिदाद (२० ते २४ जुलै) येथे होणार आहेत.