Ajinkya Rahane go to England after Test series: भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, टी-२० आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकांसाठी बीसीसीआयने अजून संघ जाहीर केले नाहीत. पण कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात अजिंक्य रहाणेचे स्थान पक्के मानले जात आहे. कारण त्यांनी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये शानदार फलंदाजी केली होती. परंतु कसोटी मालिकेनंतर अजिंक्य रहाणे इंग्लंडला जाणार आहे.
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी मालिका खेळल्यानंतर इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. रहाणे कौंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशायरकडून खेळणार आहे. या वर्षी जानेवारीमध्ये रहाणेचा लीसेस्टरशायरसोबत करार झाला होता, पण डब्ल्यूटीसी फायनलसाठी टीम इंडियामध्ये निवड झाल्यामुळे त्याला तिथे जाण्यास विलंब झाला. आता रहाणे वेस्ट इंडिज दौऱ्यावरही संघाचा भाग असेल. अशा स्थितीत रहाणे विंडीज दौऱ्यानंतरच कौंटी खेळायला जाणार आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली माहिती –
लीसेस्टरशायरच्या करारानुसार, अजिंक्य रहाणेला जून ते सप्टेंबर दरम्यान ८ प्रथम श्रेणी सामने, तसेच रॉयल लंडन चषक खेळायचा होता, परंतु रहाणेची प्रथम आयपीएलमध्ये सीएसके आणि त्यानंतर डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडियासाठी निवड झाली. त्यामुळे त्याला इंग्लंडला जाता आले नाही, पण आता बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, रहाणे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांनंतर थेट इंग्लंडला रवाना होईल आणि उर्वरित सामन्यांसाठी तो लीसेस्टरशायर संघात सामील होईल.
हेही वाचा – Father’s Day 2023: “तुमची आठवण येते बाबा…”, ‘फादर्स डे’ला सचिन तेंडुलकर झाला भावुक
अजिंक्य रहाणे रॉयल लंडन कप खेळणार –
इंग्लंडमध्ये अजिंक्य रहाणे ऑगस्टमध्ये रॉयल लंडन चषक खेळणार आहे, जो ५० षटकांचा आहे. रहाणे यापूर्वी २०१९ च्या हंगामात हॅम्पशायरकडून खेळला होता, जेव्हा त्याला ५० षटकांच्या विश्वचषक संघातून वगळण्यात आले होते. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताच्या पहिल्या डावात ८९ धावा करणाऱ्या रहाणेने अलीकडेच ८३ कसोटीत ५००० धावा पूर्ण केल्या आहेत.